भाजपने गाठली हीन पातळी : आमदार प्रणिती शिंदे

BJP reached inferior level says MLA Praniti Shinde
BJP reached inferior level says MLA Praniti Shinde

सोलापूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या कामांची पावती म्हणून कर्नाटकमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल. मात्र, विधिमंडळ त्रिशंकू होईल, असेे भाजपचे लोक जाणीवपूर्वक खोटा प्रचार करीत आहेत. खरं बोला मोदी अशी आमची ट्विटरवर टॅगलाईन आहे. काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहता मोदींच्या पायाखालची जमिन सरकली आहे. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत, अगदी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करीत आहेत, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी आज (बुधवार) 'सकाळ' शी बोलताना केला. 

आमदार शिंदे यांच्याकडे बागलकोट जिल्ह्याची जबाबदारी आहे. तेथील प्रचार आणि एकूणच कर्नाटक राज्यातील रणधुमाळीचा अनुभव त्यांनी कथन केला. त्या म्हणाल्या ''काल सोनिया गांधी यांची जाहीर सभा झाली. त्या सभेला एक लाख मतदार उपस्थित होते. सभेच्या तयारीसाठी एम. बी. पाटील यांना फक्त 48 तासांचा अवधी होता. या उलट मोदींच्या सभेसाठी महिन्यापासून तयारी सुरु होती. मात्र मोदींच्या सभेला प्रतिसाद मिळाला नाही. कर्नाटकची जनता ठामपणे सिद्धारामय्या यांच्या पाठिशी आहे. कारण त्यांनी कामच त्या पद्धतीने केली आहेत. संघटनाही तितकीच मजबूत आहे. त्यामुळे मतदारांचा कल काँग्रेसकडे असल्याचे दिसून येईल." 

"प्रचार करताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून फार हीन पातळीचा वापर केला जात आहे. त्याच शब्दांत त्यांच्याबद्दल बोलणे ही आमची संस्कृती नाही. त्यांचे मंत्रीही खालच्या
पातळीवर जाऊन बोलत आहेत. त्यांच्याकडूनही बोलताना चुका होत आहेत. एका ठिकाणी सुमारे दहा हजार मतदान अोळखपत्रे सापडली. आता बूथ कॅप्चरींग करणे, मतदान यंत्रात बिघाड करण्यासह साम-दाम-दंड-भेदचा वापर करत सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला भाजपचे नेते जाण्याची शक्यता आहे. माझ्याकडे बागलकोट जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्याठिकाणी सहा आमदार आहेत. प्रचारादरम्यान मतदारांचा कौल घेतला. त्यावेळी काँग्रेसने खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्याच पाठिशी राहणार असल्याचे मतदारांनी सांगितल्याचेही आमदार शिंदे म्हणाल्या. 

"कर्नाटकमधील निवडणूक ही आगामी लोकसभेची रंगीत तालीमच म्हणावी लागेल. त्याठिकाणी काय निर्णय लागतो, त्यावर आगामी लोकसभेचे भवितव्य असणार आहे. गुजरातमध्ये भाजपला दणका बसला आहे, त्यामुळे कर्नाटकमध्ये कोणत्याही स्थितीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे नेते काहीही करायला तयार आहेत. त्यामुळेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची ही रंगीत तालीम आहे'', असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com