ओवैसींना मानपत्र देण्याच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

सोलापूर - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना महापालिकेतर्फे मानपत्र देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय आज झाला. भाजप-शिवसेनेच्या पार्टी मिटींगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, समांतर जलवाहिनीवरून मंत्र्यांचे अभिनंदन करायचे दोन प्रस्ताव आले होते. ते एकत्रित करण्याचा निर्णय भाजपच्या मिटींगमध्ये झाला. आज (शुक्रवारी) सकाळी सभा होणार आहे.

सोलापूर - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना महापालिकेतर्फे मानपत्र देण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय आज झाला. भाजप-शिवसेनेच्या पार्टी मिटींगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, समांतर जलवाहिनीवरून मंत्र्यांचे अभिनंदन करायचे दोन प्रस्ताव आले होते. ते एकत्रित करण्याचा निर्णय भाजपच्या मिटींगमध्ये झाला. आज (शुक्रवारी) सकाळी सभा होणार आहे.

ओवैसी यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन महापालिकेने त्यांना मानपत्र द्यावे, असा प्रस्ताव एमआयएमचे रियाज खरादी, तौफीक शेख व गाझी जहागिरदार यांनी दिला आहे. त्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली. काहीही झाले तरी ओवैसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव मंजूर न करण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत झाला. तर, "सोलापूरसाठी ओवैसी यांनी काय केले' असा मुद्दा शिवसेनेतर्फे उपस्थित केला जाणार आहे. या प्रस्तावासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका आज (शुक्रवारी) होणाऱ्या सभेच्या वेळीच स्पष्ट होणार आहे. 

उजनी ते सोलापूर जलवाहिनीसाठी 439 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल संबंधित मंत्री व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्याचे दोन प्रस्ताव दाखल झाले आहेत. स्वतंत्र प्रस्ताव देताना सहकारमंत्री गटाने योजनेचे श्रेय महापौरांना देतानाच, दोन्ही मंत्र्यांचा उल्लेख टाळला आहे. तर पालकमंत्री गटाने स्थानिक दोन्ही मंत्र्यांसह मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा उघड झाल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे दोन्ही विषय एकत्रित करण्याचा निर्णय पार्टी मिटिंगमध्ये झाला. 

दरम्यान, एनटीपीसीने 250 कोटी रुपये मंजूर केले, त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आवश्‍यक आहे, असे गटनेते चेतन नरोटे यांनी सांगितले. त्यांचा उल्लेख टाळल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. सभागृह चालू देणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, श्री. शिंदे यांच्या नावाबाबत उपसूचना काँग्रेसने मांडली, तर त्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेत सत्ताधाऱ्यांनी दिले आहेत.

रामदेवबाबाने सोलापूरला काय दिले? 
योगगुरु रामदेवबाबा यांना महापालिकेचा ठराव न होता मानपत्र देण्यात आले. त्यांनी सोलापूरसाठी काय केले, याबाबत ऍड. ओवीसी यांच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन श्री. खरादी यांनी केले. 

Web Title: BJP-Shiv Sena's opposition to Owaisi proposal