ओवैसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव फेटाळला

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

सोलापूर -  एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना महापालिकेतर्फे मानपत्र देण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला. हैदराबादच्या धर्तीवर सोलापुरात कामे केल्यावर मानपत्रासाठी विचार केला जाईल, अशी उपसूचना सत्ताधारी पक्षाने मांडली. ती बहुमताने मंजूर करण्यात आली.

सोलापूर -  एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना महापालिकेतर्फे मानपत्र देण्याचा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला. हैदराबादच्या धर्तीवर सोलापुरात कामे केल्यावर मानपत्रासाठी विचार केला जाईल, अशी उपसूचना सत्ताधारी पक्षाने मांडली. ती बहुमताने मंजूर करण्यात आली.

ओवैसीं यांनी हैदराबादमध्ये केलेली विकासकामे, त्यांचा संसदेने केलेला गौरव या धर्तीवर त्यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव एमआयएमच्या सदस्यांनी दिला होता. त्यावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. चर्चेत एमआयएमतर्फे तौफीक शेख, रियाज खरादी यांनी, तर शिवसेनेतर्फे गुरशांत धुत्तरगावकर यांनी मत व्यक्त केले. भाजपने 
उपसूचना मांडली होती, तरी त्यांच्या एकाही सदस्याने चर्चेत सहभाग घेतला नाही. मात्र चर्चेदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर का बंदी घालण्यात आली, हा मुद्दा आला त्यावेळी मात्र भाजपचे सदस्य उठले. हा विषय चर्चेचा नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मानपत्राच्या प्रस्तावावर श्री. धुत्तरगावकर यांनी एमआयएमची स्थापना व त्याचा पुर्वइतिहास स्पष्ट केला. तर, सोलापूरसाठी कोणतेही योगदा न देणाऱ्या रामदेवबाबांना ठराव नसतानाही मानपत्र कसे दिले गेले, हा प्रश्न श्री. खरादी यांनी उपस्थित केला. त्याबाबत काहीच उत्तर सत्ताधाऱ्यांना देता आले नाही. दरम्यान, तौफीक शेख यांनी आमचा विषय प्रस्ताव मांडणे आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे तो महापौरांनी घ्यावा, असे सांगितले. त्यावेळी उपसूचना बहुमताने मंजूर झाल्याची घोषणा महापौरांनी केली. 

भाजपने केला आमचा वापर - शेख
ज्या-ज्या वेळी भाजप अडचणीत असते, त्यावेळी ते आमची मदत घेतात. अनेक प्रस्तावामध्ये आम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांची नाचक्की वाचली आहे. आता त्यांनी आम्हाला मदत मागितली तर त्यापूर्वी विचार करण्यात येईल, असे एमआयएमचे शहराध्यक्ष तौफीक शेख यांनी सांगितले.

Web Title: bjp shiv senas opposition owaisi proposal