भाजपने स्थापना दिवस 1 एप्रिलला साजरा करावा- धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पंढरपूर- भाजपने स्थापना दिवस 1 एप्रिल रोजी  साजरा करायला हवा होता चुकन ते आज साजरा करतायत, आधी खायला भाकर आणि रोजगार द्या मग देशात 60 लाख स्वच्छता गृहे बांधा अशा शब्दांत सरकारवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल केला. आज देशातील प्रत्येक नागरिकांवर 15 लाख कर्ज होण्याची भीती आहे त्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील खोटारडे सरकार उलथून टाकण्यासाठी हल्लाबोल आंदोलन करत आहोत असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित हल्लाबोल यात्रेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, शिवसेनेची भूमिका गांडुळा सारखी आहे, उद्धव ठाकरे यांनी एकही संस्था उभी केली नाही, एका नगरपालिकेचा विकास त्यांना करता आला नाही ते राज्याचा काय विकास करणार. भाजपा बरोबरच शिवसेनेचे देखील नामो निशान शेतकरी  मिटवतील. तसेच सत्तेला लाथ मारू म्हणणाऱ्या शिवसेनेला दोन जनावरे भेट देणार आहोत, गायीची धार काढून दाखवावी असेही मुंडे म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, 2004 साली शरद पवार कृषीमंत्री असताना 71 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी दिली होती, कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकऱ्यांना  वेठीस धरले, सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने पवार साहेबांनी दिले. मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका राष्ट्रवादीने पार पाडली आहे. भाजप सरकारच्या काळात दलितांवर अन्याय अत्याचार वाढले, चार वर्षात सरकारने फसवणूक केली आहे, या सरकारला हाकलून दया, सरसकट कर्ज माफी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार.
 
Web Title: bjp should celebrate foundation day on 1st april