'कोल्हापूरातून मोदींच्या विचाराचा उमेदवार विजयी होईल' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राम मंदिर हा भाजपसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र विकासाच्या मुद्यावरच पुन्हा आपण निवडणूक लढवू हे सांगताना त्यांना केंद्र सरकारने सवर्णांना जे 10 टक्के आरक्षण दिले आहे. अन्य कोणाचाही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले आहे. न्यायालयात हे आरक्षण टिकेल यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला. 

राफेल विमानखरेदी प्रश्‍नी उपाध्ये यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. कोल्हापूर लोकसभेसंबधी विचारणा केली असता त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे मोदी यांच्या विचाराचा उमेदवार कोण हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. उपाध्ये म्हणाले, ""विमान खरेदीवरून भाजपवर जे आरोप आहेत. ते पुर्णतः चुकीचे आहेत. तीच तीच गोष्ट पुन्हा सांगण्याची कॉंग्रेसची प्रवृत्ती आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबधी स्पष्टीकरण दिले असतानाही जाणीवपुर्वक संशयाचे वातावरण तयार केले जात आहे. भाजपची नियत स्पष्ट असल्याने क्रॉंग्रेसच्या पचनी पडत नाही. त्यामुळे रडीचा डाव खेळला जातो. उत्तरे ऐकण्याची विचारण्याची कॉंग्रेसची मानसिकता नाही. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच कोणतीही चुकीची माहिती दिलेली नाही. कॉंग्रेस अमुक एका कंपनीला विमान खरेदीचा ठेका का दिला नाही, याची विचारणा करते. पण त्या कंपनीच्या प्रमुखांनी या संबधी स्पष्टीकरण दिले आहे. 

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राम मंदिर हा भाजपसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र विकासाच्या मुद्यावरच पुन्हा आपण निवडणूक लढवू हे सांगताना त्यांना केंद्र सरकारने सवर्णांना जे 10 टक्के आरक्षण दिले आहे. अन्य कोणाचाही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले आहे. न्यायालयात हे आरक्षण टिकेल यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.

Web Title: BJP spokeperson Keshav Upadhye talked about Kolhapur loksabha election