'मोदी कर्मयोगी, तर फडणवीस संत'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

भाजप-शिवसेना साथसाथ 
शिवसेना-भाजप यांचे आचार वेगळे असले, तरी विचार एक आहेत, हिंदुत्ववादी आहेत. शिवसेना आमच्याबरोबर होती, आहे आणि राहील, असा विश्‍वासही शालिनी यांनी व्यक्‍त केला.

सातारा : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसने कोणतेही काम दलालांना घेतल्याशिवाय केले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारदर्शकपणे निर्णय घेत हा दोन सरकारमध्ये करार केला. राहुल गांधी खोटे बोलून स्वत:ला राजकीय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजप प्रदेश प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी यांनी केला. तसेच "नरेंद्र मोदी कर्मयोगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत, तर अमित शहा सर्वेसर्वा आहेत,' अशी स्तुतीसुमनेही त्यांनी उधळली. 

राफेल विमानाच्या खरेदीच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष देशभरात प्रवक्‍त्यांमार्फत पत्रकार परिषदा घेत आहेत. शालिनी यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ""राफेल विमान खरेदीत पारदर्शकता असून, त्यात घोटाळा झाल्याचे पसरवून कॉंग्रेस देशाच्या जनतेला खोटी माहिती देत आहे. राफेलला सर्वोच्च न्यायालयानेही क्‍लीन चिट दिली असताना राहुल गांधी, कॉंग्रेस त्याविरोधात बोलून न्यायालयाचा, देशातील जनतेचा, जवानांचा अपमान करत आहेत. त्यांनी जाहीरपणे या सर्वांची माफी मागावी. राहुल यांच्या नावापुढे गांधी लागले असल्याने ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे समजू लागले आहेत.'' 

नरेंद्र मोदी देशाचे चौकीदार ते शुद्ध आहेत. कॉंग्रेसने केलेला स्टंट पूर्णतः अयशस्वी झाला आहे. कॉंग्रेसला नेहमीच खोटे पसरवण्याची सवय लागली आहे. एखादी खरी गोष्ट सातत्याने खोटी असल्याचे सांगितले गेले की, ती खरी वाटू लागते. त्याप्रमाणेच राफेलचे प्रकरण सुरू आहे. ही खरेदी भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये सुरू आहे. त्यात कोणीही दलाल नाही. त्यामुळे भ्रष्टाचार होणे शक्‍यच नाही. खरेदी प्रक्रिया 2001 पासून यूपीए सरकारच्या काळात सुरू आहे. त्याची अंमलबजावणी भाजप व मित्रपक्षाने केली. दहा वर्षांत जे कॉंग्रेस करू शकले नाही, ते आम्ही करून दाखवले. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्याधुनिक साहित्य आपल्या सैन्यदलाला मिळवून देणे आवश्‍यक आहे. परदेशी तंत्रज्ञान खरेदीत तीस टक्‍के स्थानिक कंपनीचा सहभाग असावा, यासाठी रिलायन्स कंपनीचा समावेश केला आहे. तो करार फ्रान्स सरकारने केला आहे. त्यातून सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करता येईल. मात्र, कॉंग्रेसने याला भ्रष्टाचाराची जोड दिली. जेपीसी नेमण्याला आमचा विरोध नाही. परंतु, तसे केल्यास हे विमान लवकर लष्करात येणार नाही.'' 

भाजप-शिवसेना साथसाथ 
शिवसेना-भाजप यांचे आचार वेगळे असले, तरी विचार एक आहेत, हिंदुत्ववादी आहेत. शिवसेना आमच्याबरोबर होती, आहे आणि राहील, असा विश्‍वासही शालिनी यांनी व्यक्‍त केला.

Web Title: BJP spokeperson Shweta Shalini praise Narendra Modi