चौकीदार प्युअर आहे : भाजप प्रवक्त्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

सोलापूर : राफेल विमान खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपले मत नोंदविले आहे. या प्रकरणात झालेला व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपला चौकीदार प्युअर असल्याचे मत भाजपच्या प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

सोलापूर : राफेल विमान खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपले मत नोंदविले आहे. या प्रकरणात झालेला व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपला चौकीदार प्युअर असल्याचे मत भाजपच्या प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

राफेल प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी शालिनी यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, हेमंत पिंगळे उपस्थित होते. शालिनी म्हणाल्या, राफेल प्रकरणात कॉंग्रेस लोकांची दिशाभूल करत आहे. लोकांना खोटे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. 2001 ते 2012 या कालावधीपासून हा विषय चालू आहे. देशाला अशाप्रकारच्या विमानांची गरज आहे. ते घ्यायला हवेत असे कॉंग्रेस केवळ सांगत होती.

मात्र, प्रत्यक्षात ती विमाने खरेदी करण्याचे धाडस कॉंग्रेसने दाखविले नाही. ज्यावेळी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी कारभार सुरू केला, त्यावेळी आपल्या देशातील सैनिकांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी या प्रकारच्या विमानांची गरज ओळखून ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते, त्यावेळी कोणतेही व्यवहार मध्यस्थांमार्फत होत होते. मात्र, भाजप सरकारच्या काळात मध्यस्थांचा विषय संपला असल्याचेही शालिनी यांनी सांगितले. या प्रकरणात कॉंग्रेस न्यायालयापेक्षा मोठी असल्याचा आविर्भाव आणत आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकवेळा सैनिकांचा अपमान केला आहे. सर्जिकल स्ट्राइक कशावरून केले? त्याचे फुटेज दाखवा असे सांगतही गांधी यांनी सैनिकांचा अपमान केला आहे. या सगळ्या प्रकरणात राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी श्‍वेता शालिनी यांनी केली. 

Web Title: BJP spokesperson shweta shalini talks about Narendra Modi