राजकिय भविष्यांची चिंता असणारे आघाडीचे नेते रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

कोल्हापूर -  भाजपमध्ये यावे म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच रात्री - अपरात्री भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, असे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.  

कोल्हापूर -  भाजपमध्ये यावे म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच रात्री - अपरात्री भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, असे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.  मी टोपी फेकलेली आहे ती कुणालाही बसेल त्यातूनच आमदार विश्वजीत कदम यांनी मी भाजपमध्ये जाणार नाही, असा खुलासा केला असावा असा टोलाही श्री. पाटील यांनी लगावला.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. श्री. मुश्रीफ हे सर्हदयी माणूस आहेत.  ते अनुभवी आहेत. त्यांच्यासारखे अनेकजण भाजपमध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे,  असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादीचे दहा - बारा आमदार भाजपमध्ये येणार आहेत त्यात कोल्हापूरचा कुणाचाही समावेश नाही, असा खुलासाही श्री पाटील यांनी यावेळी केला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state President Chandrakant Patil comment