भाजपला आता 'राष्ट्रवादी'ची साथ; नगरमध्ये जिंकली निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नगर : महापालिकेतील आज झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने महापौर व उपमहापौर निवडणुकीत विजय मिळवला. भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांनी या चुरशीच्या निवडणुकीत बाजी मारली!

राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दिला. या निवडीबद्दल 'सकाळ'ने अंदाज वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला.

उपमहापौरपदी भाजपच्याच मालन ढोणे यांना संधी मिळाली. राष्ट्रवादीतर्फे गटनेता संपत बारस्कर यांनी तर शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. तर उपमहापौरपदासाठी सेनेकडून गणेश कवडे तर काँग्रेसकडून रूपाली वारे यांचा अर्ज होता. वारे यांनी अर्ज मागे घेतला.

Image may contain: 1 person, standing, sky and outdoor

शिवसेना नगरसेवकांची ट्रॅव्हल पहिल्यांदा 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत आली. त्यापाठोपाठ दुसरी गाडी आली. त्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे नगरसेवक एकत्र आले. त्यावेळी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यात बसपचेही नगरसेवक होते.

Image may contain: 2 people, people standing and outdoor

काँग्रेसचे नगरसेवक वेगळ्या गाडीत आले. त्यांच्यासोबत बसपच्या अश्विनी जाधव होत्या. 

सभागृहात गेल्यावर काँग्रेसने जातीयवादी पक्षासोबत न जाण्याचा निर्णय घेऊन बहिष्कार घातला. छिंदमने शिवसेनेला मतदान केले म्हणून त्याला मारहाण झाली आणि प्रक्रियेवर बहिष्कार घातला. एका खासदार आणि आमदाराने सांगितल्याने छिंदमने ही चाल केल्याचा आरोप शिवसेनेने केला. शिवसेना गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी छिंदमचे मत ग्राह्य धरले जाऊ नये असे पत्र दिले होते. मात्र प्रशासनाने ते ग्राह्य धरले नाही.

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoor

Web Title: BJP wins mayor and deputy mayor seats with the help of NCP in Nagar

टॅग्स