लाचेची मागणी करणारा भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष ताब्यात

हुकूम मुलाणी
रविवार, 1 जुलै 2018

इंग्लीश स्कूल प्रवेशासमोरील गाळयात दुपारी चारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे त्याचे घराचे बांधकामा करिता रिक्षातून वाळू वाहतूक करताना सापडले. पुढील कारवाई होवू म्हणून तहसिलदार, नायब तहसीलदार यांची ओळख असल्याचे सांगून हे त्यांच्या मार्फत हे प्रकरण मिटवण्यासाठी सदरच्या रकमेची मागणी करण्यात आली होती. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाय्राची नाव घेतल्याने खळबळ उडाली.

मंगळवेढा : वाळू वाहतूक करणाय्रा रिक्षावर कारवाई होवू नये म्हणून 35 हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष आबासो संदीपान लांडे (वय 28) यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे येथील पो. नि. चौधरी व पो. नि. हिवरकर यांच्या पथकांने रंगेहाथ पकडले. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

इंग्लीश स्कूल प्रवेशासमोरील गाळयात दुपारी चारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे त्याचे घराचे बांधकामा करिता रिक्षातून वाळू वाहतूक करताना सापडले. पुढील कारवाई होवू म्हणून तहसिलदार, नायब तहसीलदार यांची ओळख असल्याचे सांगून हे त्यांच्या मार्फत हे प्रकरण मिटवण्यासाठी सदरच्या रकमेची मागणी करण्यात आली होती. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाय्राची नाव घेतल्याने खळबळ उडाली.

या अटकेनंतर तहसिलदार, नायब तहसीलदार मोबाईलसह नॉट रिचिबल झाले.वाळू उपशाला बंदी असताना देखील महसूलच्या खात्याच्या अधिकाय्रांच्या अर्थपुर्ण सहकाय्रांने वाळू वाहतूक सुरु असून कारवाईचे सत्र मात्र पोलिसाकडूनच सुरु आहे. शाळा प्रवेशाचे दिवस असताना देखील महसूल अधिकारी कार्यालयात कमी वेळ असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे दाखले प्रलंबित राहण्याची संख्या जात असल्याबाबत पालकातून ओरड होत आहे.दाखले वेळेत मिळावे म्हणून सेतू व महा-ई-सेवा केंद्राला हेलपाटे घालून पालक बेजार होत आहेत.लाच लुचपतप्रतिबंधक खात्याच्या पुणे येथील पथकाच्या धाडीने तहसिलच्या आवारात  वावरण्याच्या झिरोनी दुपारनंतर काढता पाय घेतला.

Web Title: BJP Youth wing president arrested in Mangalwedha

टॅग्स