राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे आंदोलन...सांगलीत काय घडले वाचा. 

bjp aandolan.jpg
bjp aandolan.jpg

सांगली-  राष्ट्रवादीच्या आदिवासी प्रवर्गातील नगरसेविका स्वाती पारधी यांच्यावरील अन्यायाविरोधात आज भाजपच्या भटके विमुक्त जाती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 

मिरजेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका स्वाती पारधी यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याने कंटाळून नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. आदिवासी प्रवर्गातील नगरसेविकेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आज भाजपच्या भटके-विमुक्त जाती मोर्चाने आंदोलन केले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी पक्षाच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली. 

राष्ट्रवादी पक्षात आदिवासी समाज व मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते व नगरसेवकांवर सातत्याने अन्याय होत आहे. नगरसेवक योगेंद्र थोरात व नगरसेविका स्वाती पारधी यांनी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याबाबत पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. भाजपवर जातीयवादाचा आरोप करणारा राष्ट्रवादी हाच खरा जातीयवादी आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करतो असे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी सांगितले. 
यावेळी राजू जाधव, राहुल माने, ज्योती कांबळे, गीता पवार, संगीता जाधव, निलेश निकम, अमित भोसले, राजू मद्रासी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com