पंढरपूर संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपचे अतुल भोसले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

या मंदिर समितीचे प्रशासन चार वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या हाती आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे सभापती आहेत. समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती ३० जूनच्या आत करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेसंदर्भात दिले होते.

मुंबई : राज्यातील समस्त वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे भाजप नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे.

या मंदिर समितीचे प्रशासन चार वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या हाती आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे सभापती आहेत. समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती ३० जूनच्या आत करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेसंदर्भात दिले होते. एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड, अतुल भोसले, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, श्री गहनीनाथ औसेकर महाराज, आदी नावे चर्चेत होती. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल भोसले यांच्या नावाला पसंती दिली आहे. पक्षाला विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला गेला.

भोसले हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत. अतुल भोसले हे राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई आहेत. विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांची कन्या अतुल भोसले यांची पत्नी आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​

Web Title: BJP's Atul Bhosale, as president of Pandharpur Mandir trust