नगरमध्ये भाजपची शिवसेनेला धोबीपछाड, आघाडीलाही झटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

महापौरांच्या प्रभागातच ही निवडणूक रंगल्याने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरली. जाधव यांच्या विजयाने आता महापौरांच्या या प्रभागात चारही नगरसेवक आता भाजपचे झाले आहेत. हा भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे.

नगर ः महाराष्ट्रासह राज्यातील विविध जिल्हा परिषदा तसेच महापालिकेत महाविकास आघाडीने सत्ता काबीज केल्या. नगर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी सत्ता मिळवली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत मात्र, भाजपने महाविकास आघाडीला "धोबीपछाड' दिली. 

महापौरांचा प्रभाग
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 अ मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार पल्लवी जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवार अनिता दळवी यांचा एक हजार 712 मतांनी दारुण पराभव केला. महापौरांच्या प्रभागातच ही निवडणूक रंगल्याने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरली. जाधव यांच्या विजयाने आता महापौरांच्या या प्रभागात चारही नगरसेवक आता भाजपचे झाले आहेत. हा भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे.

pallavi jadhav

 विजयी उमेदवार पल्लवी जाधव

बाराशे मतांनी विजय
शिवसेनेच्या अनिता लक्ष्मण दळवी व भाजपच्या पल्लवी दत्तात्रेय जाधव यांच्यात या निवडणुकीत सरळ लढत झाली. त्यातील जाधव यांना दोन हजार 915 तर दळवी यांना एक हजार 203 मते मिळाली. त्यातही नोटाला 119 मते मिळाली. महापौर वाकळे यांचा हा प्रभाग असल्याने, त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. डिसेंबर 2018मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळी या प्रभागात भाजपने तीन तर शिवसेनेने एक जागा मिळविली होती. 

nagarsevika jadhav

विजयानंतर जाधव यांना प्रमाणपत्र देताना अधिकारी.

सारिका भूतकर यांचे प्रमाणपत्र झाले होते बाद
शिवसेनेकडून निवडणूक लढवून विजयी ठरलेल्या सारिका भुतकर यांच्या जातप्रमाणपत्र विभागीय आयुक्‍त कार्यालयाने बाद ठरविले. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली.

प्रभाग 6 मधील 16 केंद्रांवर मतदान झाले. प्रभागात 13 हजार 621 मतदार होते. मात्र, केवळ 31 टक्‍केच मतदान झाले. चार हजार 237 मतदान वैध ठरले. या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. नोटानेही शंभरी पार केली. आजच्या निकालामुळे प्रभाग सहामध्ये महापौर वाकळे, पल्लवी जाधव, वंदना ताठे व रवींद्र बारस्कर असे चारही नगरसेवक भाजपचे झाले आहेत. 

निवडणुकीत मिळालेले मतदान

पल्लवी जाधव - 2915 मते 
अनिता दळवी - 1203 मते 
नोटा - 119 मते 
एकूण वैध मते - 4237 मते 

महापालिकेतील पक्षीय बलाबल 
शिवसेना 23, भाजप 15, राष्ट्रवादी 18, कॉंग्रेस 5 
बसप 4, सपा , अपक्ष 2. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's victory in the Ahmednagar city