भारतीय जैन संघटनेतर्फे 15 लाख रुग्णांना सेवा

corona
corona

सांगली ः कोरोना संकट काळात भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्सतर्फे देशात "डॉक्‍टर आपल्या दारी' उपक्रमांतर्गत फिरता दवाखाना सुरु आहे. गेल्या 1 एप्रिलपासून तो सुरु झाला. देशभरात 15 लाख 2 हजार 120 रुग्णांवर उपचार करण्यात आले. 20 हजार 502 रुग्णांना कोरोना अंतर्गत रुग्णालयात पाठवण्यात आले. यासाठी 235 व्हॅनचा वापर झाला. सांगली शहरात 6 हजार 169 रुग्णांवर उपचार झाले. 90 जणांना रुग्णालयात पाठविण्यात आले, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


ते म्हणाले, ""उपक्रमाची सुरुवात भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा तसेच फोर्स मोटर्सच्या व्यवस्थापकीय संचालक प्रसान फिरोदिया यांच्या हस्ते झाली. डॉक्‍टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे मोफत पुरवली जातात. व्हॅनमधील रुग्णांची ताप आणि सर्दी खोकल्याची तपासणी होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक उपाय योजनांचे अनुपालन केले जाते. मोबाईल डिस्पेंसरीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेला मदतीचा हात म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईसह राज्यभरात आणि कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात राज्यात उपक्रम सुरु आङे. रक्तसंग्रह क्षमता वाढवणे, मोबाईल क्‍लिनिक, मोफत अन्न पुरवठा सुरु आहे.'' 


ते म्हणाले, ""युवती सक्षमीकरण, मूल्यवर्धन, सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र, उद्योजकता विकास शिबिरे, आपले व्यवस्थापन, संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन, अल्पसंख्यांकाच्या सवलतीचे शिबिर असे उपक्रम आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यातील 5 तालुक्‍यात 296 मशिनच्या साह्याने 58 हजार 650 तास दुष्काळमुक्त अभियानासाठी काम झाले. 350 कोटी लिटर पाणी साठा तयार झाला आहे. पूरग्रस्तांना मदतीला हात दिला. "युवती सक्षमीकरण' उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेतली गेली.'' 
यावेळी राज्य सदस्य राजगोंडा पाटील, जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, सांगली जिल्हा सचिव वसंत पाटील, सुभाष देसाई, धन्यकुमार शेट्टी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com