सांगली : काळविटाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

सांगली : काळविटाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

कडेगाव - तडसर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्लात काळविटाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी घडली.  कुत्र्यांच्या हल्ल्यात वन्यप्राण्याचा मृत्यूची ही महिन्यातील दुसरी घटना आहे. 

कडेगाव तालुक्यातील सागरेश्वर अभयारण्यात काळविट व
हरणांचे कळप मोठ्या प्रमाणात आहेत. ते आपले खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडतात. त्यापैकी काही काळविट व हरणांच्या कळपांचा तडसर, शिरसगाव, वांगी, हिंगणगाव खुर्द, नेर्ली आदी ठिकाणच्या वनक्षेत्रात अधिवास वाढला आहे. 

त्यापैकी एक काळविट शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास तडसर येथे वन क्षेत्रानजीक शेळके वस्ती येथे भटकत आले. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यावेळी येथील शेतकरी सुमित तडसरकर व सागर जाधव यांनी त्या काळविटाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना यश आले. परंतु तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते. याबाबत पोलीस पाटील संजय माळी यांनी कडेगाव येथील वन क्षेत्रपाल कार्यालयाला माहिती दिली.

दरम्यान वन क्षेत्रपाल एस. एस. मगर, वनपाल आर. आर. पाटील, वनरक्षक अनिल कुंभार यांचेसह वनमजुर घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत हरीण गंभीर जखमी झाले होते. तर सोनसळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्री. बर्गे यांनी जखमी काळविटावर उपचार केले. परंतु ते गंभीर जखमी झाल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या काळविटाचे पशुवैद्यकीय अधिकारी श्री. बर्गे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळविटाच्या मृतदेहाचे येथे वनक्षेत्रात दफन केले. यावेळी वनपाल आर. आर. पाटील, वनरक्षक अनिल कुंभार, वनमजूर आदी उपस्थित होते.
...............

फोटो ओळी
तडसर (ता.कडेगाव) : येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले काळविट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com