मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार - नाथपंथीय डवरी समाजाचा इशारा

सिद्धार्थ लाटकर 
सोमवार, 2 जुलै 2018

सातारा - राईनपाडा (जि. धुळे) येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीचा निषेध आज नाथपंथीय डवरी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बोंबाबोंब आंदोलन करुन केला. या प्रकारामुळे समाजातील गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न न केल्यास त्यांना पश्‍चिम महाराष्ट्रातील दौऱ्यात काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

आदिवासीबहुल साक्री तालुक्‍यातील राईनपाडा (जि. धुळे) येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. यातील चार जण मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील, तर एक जण कर्नाटकातील आहे. सर्व मृत नाथपंथीय डवरी समाजातील असून, गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्यांतील आहेत. त्यांना झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याने समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात मारेकऱ्यांना आंतकवादी घोषित करुन त्यांना जन्मठेप अथवा फाशी व्हावी, मयतच्या प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावेत या दोन प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा अन्यथा त्यांना पश्‍चिम महाराष्ट्रातील दौऱ्यात काळे झेंडे दाखवू असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान उदरनिर्वाहासाठी गावोगावीा समाजातील लोक फिरत असतात त्यांना जिल्हा प्रशासनाने व पोलिसींनी सुरक्षा द्यावी अशी ही मागणी करण्यात आली. यावेळी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटना भटक्‍या विमुक्त जाती आघाडीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ शिंदे, महेश पवार, गणेश पवार, अविनाश पवार, भोपाल घाडगे, मोहन शिंदे, बाळू इंगवाले, फारुख पटनी, दत्ता इंगवले, शंकर बाबर, कालीदास शिंदे, सनी पवार, धोंडीराम इंगवले आदी उपस्थित होते. 

Web Title: Black flag showcases Chief Minister rally - Nath Dwari community's warning