आटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे

नागेश गायकवाड
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

आटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली गेली चार महिने आंदोलन सुरू आहे. आरक्षणासाठी आरेवाडी, पुणे आणि औरंगाबाद येथे समाजाने भव्य मेळावे घेतले होते. तसेच राज्यभर सभा सुरू आहेत.     

भाजप सरकारने सत्तेवर आल्यावर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. या मुद्यावर राज्यातील धनगर समाज भाजप उमेदवारांच्या पाठीशी राहीला. मात्र भाजप नेत्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे.  गेली चार वर्षे सरकार आरक्षण देण्यास टोलवाटोलवी करत आहे. आरक्षण कशा पद्धतीने देता येते याची माहिती आंदोलकांनी सरकारकडे सादर केली आहे. मात्र सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. सरकारने समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, यासाठी लक्ष वेधण्यासाठी राज्यभर संपूर्ण धनगर समाज बांधवांनी आजपासून घरावर सरकारच्या निषेधार्थ काळे झेंडे लावले आहेत. हे झेंडे आठ दिवस ठेवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.

धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन याची आठवण करून देण्यासाठी आणि सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी काळे झेंडे लावले आहेत.
- गोपीचंद पडळकर   

Web Title: Black flags laid on the house by protesting at Atpadi