मंगळवेढ्यातील शाळांमध्ये ब्लेझरवरील बहिष्कार शंभर टक्के यशस्वी

हुकूम मुलाणी 
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा - शाळेच्या पहिल्या दिवशी तालुक्यात गणवेश व ब्लेझर संदर्भात तपासणीचे नियोजन प्रशासनाच्या वतीने केलेले आहे. या आवाहनास शिक्षकांनी विरोध केला असून  ब्लेझरवरील बहिष्कार शंभर टक्के यशस्वी करण्यात येत आहे.

मंगळवेढा - शाळेच्या पहिल्या दिवशी तालुक्यात गणवेश व ब्लेझर संदर्भात तपासणीचे नियोजन प्रशासनाच्या वतीने केलेले आहे. या आवाहनास शिक्षकांनी विरोध केला असून  ब्लेझरवरील बहिष्कार शंभर टक्के यशस्वी करण्यात येत आहे.

याबाबत काल मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची ब्लेझर व गणवेश संदर्भात सहविचार सभा रविवार जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी सभागृहात घेवून यावर बहिष्कार घालण्याचा ठराव मंजूर केला. ब्लेझर सक्ती हा चुकीचा निर्णय असून ग्रामीण व दुष्काळी परिस्थितीत जेथे अनेक शाळेत लाईटची सुविधा उपलब्ध नाही अशा परिस्थितीत ब्लेझरची सक्ती करणे अव्यवहार्य आहे. तसेच संघटनेच्या अस्तित्वाला बाधा येईल अशा बातम्या देवून प्रशासन शिक्षकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि झालीच तर समन्वय समितीच्या वतीने त्याची सर्व जबाबदारी घेतली जाईल. तरी कोणत्याही कारवाईला न घाबरता 100% बहिष्कार घालावा आणि असे आवाहन केले होते.

यावेळी समन्वय समितीच्या वतीने सुरेश पवार, उमेश कांबळे, संजय चेळेकर, श्रीमंत पाटील, श्यामराव सरगर, भाऊसाहेब माने, सिध्देश्वर सावत, राजेंद्र कांबळे, रविंद्र लोकरे, लक्ष्मण घुले, भगवान चौगुले संभाजी तानगावडे आदि पदाधिकारी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि बहुसंख्येने शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Blazer boycott in the schools