दावे-प्रतिदाव्यांनी ब्लेझर गाजला 

blazer
blazer

सोलापूर : दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून (ता. 19) जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, ब्लेझरने पहिलाच दिवस गाजला. प्रशासनाने शिक्षकांना ब्लेझर घालणे सक्तीचे केले. परंतु, संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला. दरम्यान, प्रशासनाने 70 टक्के शिक्षकांनी ब्लेझर घातल्याचा दावा केला आहे. याउलट शिक्षक संघटनांनी मात्र ब्लेझरवर 95 टक्के शिक्षकांनी बहिष्कार घातल्याचे म्हटले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
शाळेच्या पहिल्या दिवशी ब्लेझरच्या संदर्भात तपासणी ठेवली होती. त्यामुळे नेमके काय होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, काही तालुक्‍यांमध्ये गुरुजींनी ब्लेझरला विरोध केला, तर काही ठिकाणी गुरुजी ब्लेझर घालून आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील तीन शाळांना भेटी दिल्या. त्यापैकी मजरेवाडी व अकोलेकाटी शाळेतील शिक्षकांनी ब्लेझर परिधान केले होते. 

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आहेरवाडी व हत्तूर या गावातील शाळांना भेटी दिल्या. या दोन्ही शाळांतील शिक्षकांनी ब्लेझर घातला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या दोन्ही शाळांतील गुणवत्ताही चांगली होती, असेही गुंडे यांनी सांगितले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांनी हद्दवाढ भागातील देगाव व आनंदनगर या शाळांना भेटी दिल्या. या दोन्ही शाळांतील गुरुजी ब्लेझरविना शाळेत आले होते. त्याठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणेला वाव आहे. त्यात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्याचे राऊत यांनी सांगितले. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी नरोटेवाडी, मार्डी, गुळवंची या शाळांना भेटी दिल्या. त्यात नरोटेवाडी व गुळवंची या शाळांतील शिक्षकांनी ब्लेझर घातले नव्हते. मार्डी येथील दोन्ही शाळांतील शिक्षक ब्लेझरमध्ये उपस्थित होते. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रमेश जोशी यांनी बार्शी तालुक्‍यातील मांडेगाव व पानगाव या शाळांची तपासणी केली. यापैकी मांडेगाव शाळेतील शिक्षक ब्लेझरमध्ये होते. पानगाव शाळेतील शिक्षकांनी मात्र ब्लेझरवर बहिष्कार टाकला होता. 

कारंब्यातील शिक्षक धारेवर 
कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील शाळेत शिक्षक ब्लेझर न घालता शाळास्तरावर ठरलेल्या गणवेशात आले होते. त्या शाळेत डॉ. भारुड अचानक गेल्यानंतर संबंधित शिक्षकांनी मंगळवारपासून (ता. 20) ब्लेझर घालूनच शाळेत येऊ, असे सांगितले. डॉ. भारुड यांनी गुणवत्तेच्या बाबतीत शिक्षकांना विचारणा केली. शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य होते. त्या मुद्‌द्‌यावरूनही त्यांनी शिक्षकांना धारेवर धरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com