`गॉगलआडचा उजेड` काळाच्या पडद्याआड

`गॉगलआडचा उजेड` काळाच्या पडद्याआड

मिरज - येथील ज्येष्ठ साहित्यिक, अंधकवी राम गोसावी ( 93 ) यांचे विश्रामबागमध्ये निधन झाले. त्यांनी 1945 मध्ये काव्यलेखनाला सुरुवात केली. "डोळे" या त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला 1976 - 77 मध्ये राज्य शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार मिळाला होता. अंधारबन, देवाघरचे दिवे, अंतर्वेध हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. 'चांदोबाच्या घरी' हा बालकवितासंग्रहदेखील प्रसिद्ध आहे. स्वतःच्या दृष्टीहीन जीवनाबद्दलचे `गॉगलआडचा उजेड` हे आत्मचरित्रही बरेच प्रसिद्ध झाले.

1991 मध्ये पुण्यात भरलेल्या अंध - अपंगांच्या दुसऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले होते. मराठी  वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन आदी माध्यमातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. असंख्य छोट्या - मोठ्या कविसंमेलनात सहभागी झाले होते. 1965 मध्ये नेत्रपटलाच्या विकाराने त्यांना दृष्टी गमवावी लागली. त्यामुळे बांधकाम विभागातील नोकरी सोडावी लागली. त्यानंतर अखंड साहित्यसेवेला वाहून घेतले. दृष्टी नसतानाही त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत डिसेंबर 2000 मध्ये 'भरारी' पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता. मिरजेतील शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ या संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक होते.  त्यांच्या पश्चात मुलगा मुकुंद, मुलगी चित्रा कलोटी आणि नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com