अनोख्या उपक्रमातून मित्राला वाहिली आदरांजली

blood donation camp in hupari kolhapur maharashtra.gif
blood donation camp in hupari kolhapur maharashtra.gif


हुपरी (कोल्हापूर) ः रयत शिक्षण संस्थेच्या येथील हुपरी इंग्लिश स्कूलमधील 1994 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी वर्गमित्र आदिनाथ विजयकुमार पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे सातशेहून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

हे पण वाचा- दिवंगत मित्राला अनोख्या उपक्रमातून वाहिली श्रद्धांजली, तरूणांचे  काैतूक

सकाळपासून सुरु झालेले रक्तदान शिबिर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. रक्तदान शिबिरामध्ये विविध शाळा, महाविद्यालयांमधील युवक-युवती, विविध मंडळांचे कार्यकर्ते, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी, हुपरी पालिकेतील कर्मचारी आदींनीसहभाग नोंदवला. पती-पत्नी मिळून जोडीने अनेकांनी रक्तदान केले. त्या सर्वांचा 94 ग्रुपतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

हे पण वाचा- सावधान ! जोतिबाला जाताय...

दिवंगत आदिनाथ पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते व माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट, जेष्ठ नेते महावीर गाट, उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे, पाणी पुरवठा समिती सभापती सूरज बेडगे, उद्योजक मोहन वाईंगडे, अजित पाटील, नगरसेवक तसेच कोल्हापूरच्या रॉयल रायडर्स क्‍लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
रक्तदान शिबिरा सोबत गतवर्षी प्रमाणे यावर्षीही अवयव दान व देह दान जागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या दीपक पाटील (सायकलपटू), स्वरूप प्रविण शेटे, हर्ष प्रविण शेटे, अमृत दत्तात्रय मुधाळे, दिग्दर्शक विजय माळी, स्मिता पाटील, रॉयल रायडर क्‍लब, कोल्हापूर व स्मिता फौंडेशन यांचा ग्रूपतर्फे सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com