डॉ. बाबासाहेबांची जयंती निमित्त रक्तदान शिबिर

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

मोहोळ - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन विविध समाजीक उपक्रम राबविले जात आहेत. अशा सामाजिक उपक्रमातूनच डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे समाधान मिळणार आहे. लॉर्डबुद्धा प्रतिष्ठानाने यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी म्हटले आहे.

यावेळी सरपंच रंजना लवटे, उपसरपंच दतात्रय वागज, कुंडलीक माळी, सौदागर भांगे, शाहु खडके, अंकुश शेंडगे, पोपट शेंडगे, संजय शेळके, सिध्देश्वर खडके, बाळासो भांगे, चंद्रकांत करंडे, अरुण सरवदे, आनंद ओहोळ, पवन सरवदे, राहुल ओहोळ, विश्वास शेंडगे, प्रल्हाद शेंडगे, तानाजी वाघमारे, उपस्थीत होते. यावेळी जयंती उत्सवाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. 

नवीन कार्यकारीणी याप्रमाणे 
(अध्यक्ष) गणेश शेंडगे,(उपाध्यक्ष) अविनाश शेंडगे, (खजिनदार) विखील शेंडगे, (सचिव) सुहास शेंडगे रोहित कसबे, (कार्याध्यक्ष) विकील शेंडगे, नाना शेंडगे, (मिरवणुक प्रमुख) सिध्दनाथ शेंडगे, अक्षय शेंडगे, स्वप्नील कसबे. 

यावेळी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करत,  राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे जिल्हा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी कौतुक केले. 

Web Title: Blood Donation Camp on the occasion of dr. Babasaheb's birth anniversary