युवा सेनेतर्फे रक्तदानासाठी  "मोबाईल व्हॅन' ची सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

सांगली- "कोरोना' चे संकट असताना दुसरीकडे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदानासाठी युवा सेना सरसावली असून आज रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच रक्तदात्यांना रक्तपेढीपर्यंत येण्यासाठी "मोबाईल व्हॅन' ची सुविधा दिली आहे. 

सांगली- "कोरोना' चे संकट असताना दुसरीकडे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदानासाठी युवा सेना सरसावली असून आज रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच रक्तदात्यांना रक्तपेढीपर्यंत येण्यासाठी "मोबाईल व्हॅन' ची सुविधा दिली आहे. 

"कोरोना' चा प्रसार वाढल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनामार्फत आवाहन केले जात आहे. "कोरोना' चे संकट आल्यामुळे विविध ठिकाणी होणारी रक्तदान शिबीरे थांबली आहेत. त्याचा परिणाम राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाबाबत वारंवार आवाहन करत आहेत. तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सचिव वरूण सरदेसाई यांनीही सूचना केल्या आहेत. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा सेना जिल्हा विस्तारक किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सांगलीत युवा सेना जिल्हा अधिकारी रणजीत जाधव यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. शिबीरात 110 जणांनी रक्तदान केले. 

रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी श्री. जाधव यांनी "मोबाईल व्हॅन' ची सुविधा सांगलीत सुरू केली आहे. संचारबंदीमुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही. त्यामुळे शहरातील विविध प्रभागातील मंडळे, युवक कार्यकर्ते यांनी रक्तदानाची इच्छा व्यक्त केली तर तत्काळ त्यांच्या दारात "मोबाईल व्हॅन' येईल. व्हॅनमधून शिरगावकर रक्तपेढीपर्यंत आणले जाईल. त्यानंतर रक्तदानानंतर घरी सोडले जाईल. मोबाईल व्हॅनसाठी तुषार कुंभार यांनी सहकार्य केले आहे. 
दरम्यान आजच्या रक्तदान शिबीरासाठी जिल्हा अधिकारी रणजीत जाधव, शहर प्रमुख दिनेश बाबर, राहुल यमगर, अझहर बारस्कर, श्रीकांत नरळे, अक्षय भांडवले, कृष्णा पाटील, पलाश किणीकर, फिरोज जमादार, अमोल भोसले, सईद शेख, सुजित कांबळे, प्रितम शिंदे, धनंजय सूर्यवंशी, मधु दळवी, अस्मिता जानवेकर, शीतल कांबळे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For blood donations Yuva sena give "Mobile van 'facility