सीएससीमार्फत आता गावातच होणार रक्‍ताच्या चाचण्या 

तात्या लांडगे 
रविवार, 10 जून 2018

सोलापूर : राज्यात सुमारे 75 हजार सीएससी केंद्रचालकांपैकी प्रत्येक जिल्ह्यातील 50 चालकांना रक्‍तचाचण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. नाशिक, सांगली, सातारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, बीड, उस्मानाबाद, नागपूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यातील सीएससी केंद्रचालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. बहुतांशी गावांमध्ये अल्प दरात रक्‍तचाचण्या केल्या जात आहेत.

प्रत्येक गावात विविध प्रकारच्या तपासणीसाठी लागणारे रक्‍ताचे नमुने कसे घ्यायचे, रक्‍त तपासणी कशी करावयाची याबाबत जिल्ह्यातील 50 गावातील प्रशिक्षणार्थींना ही सेवा सुरू करण्याकरिता प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये तीन दिवसीय कार्यशाळा आणि त्यानंतर एक आठवड्याचे ग्रामीण रुग्णालयात प्रात्यक्षिक देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. हा उपक्रम केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्‍त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या चाचण्या करण्याकरिता खासगी लॅबमधून जास्त प्रमाणात दर आकारले जातात. त्यामुळे सर्वसामांन्याची लूट थांबावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या सेवेतून ग्रामीण भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. सीएससीच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णांना ऑनलाईन डॉक्‍टर उपलब्ध करुन दिला जातो. 

केंद्र सरकारच्या सीएससी (सार्वजनिक सेवा केंद्र) उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात रक्‍त तपासणी केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यासाठी सीएससी केंद्रचालकांना दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये नाशिक अव्वल तर दुसऱ्या स्थानी नागपूर व तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर आहे. 
साजिद आतार, जिल्हा व्यवस्थापक, ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान

Web Title: Blood tests will be done in the village now through CSC