संचालक मंडळ ऊस उत्पादक सभादांच्या हिताच विचार करत आहे - समाधान आवताडे

हुकूम मुलाणी
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

मंगळवेढा - दामाजी साखर कारखाना निवडणुकीत सभासदांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दिवाळीला प्रती किलो 10 रु प्रमाणे साखर देणार असून, ऊस उत्पादकाला एफ.आर.फी पेक्षा प्रतीटन 73.62 वाढीव दर देताना 312.76 लाखाचा अतिरिक्त बोजा पडणार असला तरीही संचालक मंडळ ऊस उत्पादक सभादांच्या हिताच विचार करत कारभार करत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले 

मंगळवेढा - दामाजी साखर कारखाना निवडणुकीत सभासदांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दिवाळीला प्रती किलो 10 रु प्रमाणे साखर देणार असून, ऊस उत्पादकाला एफ.आर.फी पेक्षा प्रतीटन 73.62 वाढीव दर देताना 312.76 लाखाचा अतिरिक्त बोजा पडणार असला तरीही संचालक मंडळ ऊस उत्पादक सभादांच्या हिताच विचार करत कारभार करत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले 

कारखान्याच्या 30 व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर उपाध्यक्ष आंबादास कुलकर्णी,सभापती प्रदीप खांडेकर,समाजकल्याण सभापती शिला शिवशरण,जि.प.सदस्य दिलीप चव्हाण,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, ,येताळा भगत,चंद्रकांत पडवळे,दत्तात्रय भोसले,सुभाष यादव,शांतीनाथ बागल,रामचंद्र कौडूभैरी, सतीश म्हेत्रे,दिपक माने,कार्यकारी संचालक समीर सलगर, आदीसह कारखान्याचे उपस्थित होते यावेळी बोलताना अध्यक्ष आवताडे म्हणाले की दुष्काळी भागात पाणी येण्याबाबत जुलै अखेरचा दावा लोकप्रतिनिधीकडून करण्यात आला होता पण आजही पाण्यावरुन शेतकय्रांच्या थटटा करण्याचे सुरुच असून याकडे सर्वानी लक्ष देवून होणारी दिशाभूल थांबविली पाहिजे,दोन आमदाराच्या नुरा कुस्तीत मतदारसंघाचा विकास खुंटला आहे.ऊस उत्पादकाला पाण्याच्या बचतीसाठी राज्य सहकारी बॅकेकडून प्रती हेक्टरी 85400 रु ठिंबक सिंचनसाठी दोन टक्के दराने पाच वर्षासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे कारखान्याला 2220.95 लाखाचा संचीत तोटा असून 438.73 लाखाच्या ठेवी असून संचीत कोटी भरुन निघाल्यावर ठेवी परत करणार असल्याचे सांगून कारखान्याच्या अडीचणीच्या काळातही कामगारांना कामगार हिताचा विचार करुन बे्रक दिला नाही.यदांच्या हंगामात  सहा लाख ऊस गाळपाचे  उदिष्ठ असून जादा दरासाठी रॉ शुगर तयार करुन परदेशात पाठविणार आहे 

माजी अध्यक्ष चरणुकाका पाटील,गोपीनाथ माळी, दामोदर देशमुख, प्रकाश गायकवाड,जगदीश पाटील,यादाप्पा माळी,श्रीधर खांडेकर सभासद दत्तात्रय चव्हाण,सुर्यकांत केदार,महादेव पाटील अशा विचारलेल्या प्रश्नां ची उत्तरे दिली.प्रास्ताविक संचालक अशोक केदारनाथाच्या यांनी केले.कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर भागवत सलगर यांनी सभेची नोटीस व विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन करत अतिशय अडचणीतुन मार्ग काढत अध्यक्ष आवताडे  यांनी अत्यंत काटकसरीने कारभार केला असून यंदाचा गळीप हंगाम 10 ऑक्टोंबर पासून सुरु करणार असल्याचे सांगितले. यावेळी दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे,दत्तात्रय जमदाडे, सुहास पवार, दामाजीनगरचे उपसरपंच अॅ्ड.दत्तात्रय तोडकरी, संजय जगताप, संजय माळी, सुरेश ढोणे, तोडणी ठेकेदार,मजूर, ऊस वाहतुक कंत्राटदार आदि  उपस्थित होते. सुत्रसंचालन दगडू फटे  व अशोक उन्हाळे यांनी तर आभार संचालक भुजंगा आसबे यांनी मानले.

Web Title: The Board of Directors is considering the interests of sugarcane growers