सांगली : बह्मनाळमध्ये बुडालेला बोटीचा व्हिडिओ पाहा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सुमारे पंधराजणांची क्षमता असणाऱ्या बोटीमध्ये तब्बल 32 जण बसले आणि तेथेच घात झाला. अवघ्या काही मीटर अंतरावर बोट गेली आणि क्षणार्धात उलटली. पाहाता-पाहता तिने तळ गाठला. काठावरच्या गर्दीत हल्लकल्लोळ माजला. तरुणांनी जीवाची पर्वा न करता पुरात उड्या घेतल्या.

सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे ग्रामपंचायतीची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह हाती आले असून, 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आणखी 3 जणांना बुड़ाल्याची शक्यता असून बेपत्ता आहेत. शोधकार्य सुरू आहे. बोटमध्ये एकूण 30 लोक होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनकडून देण्यात आली. या बोटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सुमारे पंधराजणांची क्षमता असणाऱ्या बोटीमध्ये तब्बल 32 जण बसले आणि तेथेच घात झाला. अवघ्या काही मीटर अंतरावर बोट गेली आणि क्षणार्धात उलटली. पाहाता-पाहता तिने तळ गाठला. काठावरच्या गर्दीत हल्लकल्लोळ माजला. तरुणांनी जीवाची पर्वा न करता पुरात उड्या घेतल्या. हाताला लागतील त्यांना खेचून पाण्याबाहेर काढले. सुमारे पंधराजणांचे प्राण वाचवण्यात यश आले.

ब्रह्मनाळ (ता. पलूस ) येथे सकाळी सव्वानऊ वाजता घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना. पाण्यात पडताच गुदमरुन मरण पावलेल्या महिलांचे मृतदेह शेतात चिखलातच ठेवण्याचा करुण प्रसंग ग्रामस्थांवर ओढवला. उलटलेल्या बोटीत महिलांची संख्या जास्त होती. बाहेर काढलेल्या मृतदेहांकडे पाहून ग्रामस्थांनी अश्रूंचे बांध वाहीले. अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला कवटाळून एका महिलेने प्राण सोडले. बाळाला वाचवण्यासाठीची तिची प्राणांतिक धडपड दोघांच्याही मृत्यूजवळच थांबली. तिचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा बाळला कवटाळलेल्या अवस्थेतच होता. शांत झोपलेल्या चेहऱ्याचे बाळ पाहणाऱ्याच्या मनात कालवाकालव करणारे ठरले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boat capsized in Brahmanal Sangli