बोडो अतिरेक्याला रायबागमध्ये अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

साखर कारखान्यात कामाला, आसाम-बेळगाव पोलिसांची कारवाई

बेळगाव - ऑक्‍टोबर २०१६ मध्ये आसाम पोलिसांनी केलेल्या बोडो अतिरेकी संघटनेवरील कारवाईवेळी काही अतिरेकी फरारी झाले होते. यांपैकी एका फरारी अतिरेक्‍याला नुकतेच रायबाग येथे अटक केली. गेल्या तीन महिन्यांपासून संशयित रायबाग साखर कारखान्यात रोजंदारीवर काम करत आहे. त्याचे नाव फुस्ना फिरलांग बसुमतर्रै (वय २१, रा. ग्वाजानपुरी, जि. चिरंग, आसाम) आहे. 

जिल्हा पोलिस मुख्यालयातून मिळालेली माहिती अशी ः १३ ऑक्‍टोबर २०१६ रोजी आसाम येथे पोलिसांनी बोडो अतिरेकी संघटनेवर कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत काही अतिरेकी ठार झाले होते, तर काही पळून गेले होते. तेव्हापासून आसाम पोलिसांकडून नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंड (एस) संघटनेच्या फरारी अतिरेक्‍यांचा शोध सुरू होता. यांपैकी एक फरारी फुस्ना बेळगाव जिल्ह्यात असल्याची माहिती आसाम पोलिसांना मिळाली होती. ४ जानेवारी २०१७ रोजी आसामचे पोलिस पथक बेळगावात आले. येथील जिल्हा पोलिसप्रमुखांशी संपर्क साधून त्यांनी स्थानिक पोलिसांचे पथक बनवले. दोन्ही पथकांनी संयुक्तरित्या कारवाई करत फुस्ना बसुमतर्रै याला अटक केली. 

तेजपूर पोलिसांत गुन्हा 
फुस्ना याच्यावर आसाममधील तेजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा क्रमांक १८५६/२०१६ नुसार कलम (१२० बी, १२१, १२१ (ए), २१२, ५०६ आयपीसी व कलम १०, १३, १८ (बी) यूए (पी) कायदा १९६७ या गुन्ह्याखाली आरोपी आहे.

फुस्नाची आसामला रवानगी
बेळगाव पोलिसांच्या मदतीने अटक केलेल्या फुस्नाची येथे काही प्राथमिक चौकशी केली. यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी आसामला नेले. 

म्यानमारमध्ये तीन महिने 
अटक केलेला फुस्ना म्यानमारमध्ये तीन महिने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे कशी चालवायची याचे शिक्षण घेत होता. त्याने तेथे एके-८१ शस्त्र चालविण्याचे विशेष प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो रायबाग तालुक्‍यातील यड्राव गावाजवळ साखर कारखान्यात मजूर म्हणून काम करत होता. 

Web Title: bodo terrorist arrested in raibag