प्रवरानदीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला 

हरिभाऊ दिघे 
मंगळवार, 15 मे 2018

तळेगाव दिघे (जि. नगर) : प्रवरानदी पात्रात पाय घसरून पडून पाण्यात वाहून गेलेल्या संजय सुदाम खताळ (वय ३३) या युवकाचा मृतदेह सोमवारी साडेपाचच्या सुमारास धांदरफळ खुर्द (ता. संगमनेर) शिवारात आढळून आला. 
संजय खताळ हा रविवारी दुपारी मित्रांसमवेत गावानजीकच्या प्रवरा नदीकडे आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान, पाय घसरून तो नदीपात्रात पडला. पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून तो वाहून केला. रविवारी सायंकाळी शोध घेवूनही तो सापडला नव्हता. सोमवारी नगर अग्निशमन दलाच्या पथकातील जवान व गावातील तरुणांनी शोध मोहीम राबविली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका शेतानजीक पाण्यात संजय खताळ याचा मृतदेह आढळून आला. 

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, मृतदेह तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. सतीश दत्तात्रेय कोकणे यांनी पोलिसांत याबाबत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The body of the missing boy were found in the underworld