मोहोळ - महामार्गालगतच्या नाल्याजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह अढळला

मोहोळ - महामार्गालगतच्या नाल्याजवळ अनोळखी इसमाचा मृतदेह अढळला

मोहोळ (सोलापूर) -  गुरे राखण्यासाठी फिरणाऱ्या गुराख्यांना अंदाजे ६० ते ७० वर्षे वयाचे वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ता. १० रोजी वडाची वाडी तालुका मोहोळ येथे उघडकीस आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत. 

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (बुधवार) दुपारच्या दरम्यान मोहोळ ते शेटफळ जाणाऱ्या रस्त्यावरील महामार्गालगत असलेल्या नाल्याजवळ वडाचीवाडी गावच्या हद्दीतील माने यांच्या शेताजवळ तोंडास, डोक्यास व हातात जखम असलेले ६० ते ७० वर्षे वयोगटातील अनोळखी मृतदेह अढळला. अंगात शर्ट, धोतर, व टोपी, हातात काईसी कंपनीचे घड्याळ, बाटा कंपनीची चप्पल, रंगाने काळा सावळा, मिशीला कट, डोक्यास टक्कल, चॉकलेटी रंगाचा चष्मा, पुर्वीपासुनच नसलेली डाव्या हाताची करंगळी व त्याच्या शेजारील दोन बोटे, कानात एैकू येण्याची मशिन अश्या गोष्टी अढळल्याचे पोलिसांना सांगितले.

गुरे राखण्यासाठी गेलेल्या गुराख्यांना हा मृतदेह अढळला. त्यांनी याबाबत गावच्या पोलिस पाटील अशोक लोंढे यांच्याशी संपर्क करीत सदर घटनेची माहिती दिली. त्यानुसार लोंढे यांनी याबाबतची मोहोळ पोलिसात माहीती दिली. पोलिसांत या अनोळखी इसमाबाबत अकस्मीत मृत्युची नोंद झाली आहे. मात्र मृतदेहाच्या अंगावर असलेल्या जखमांवरून अनेक तर्कवितर्काच्या चर्चेला ऊत आला आहे. सदर व्यक्ती सधन घराण्यातील असावी असा कयास बांधला जात आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अे.एस.आय. बुरंगे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com