वैराग येथील एका बोगस भोंदू डॉक्टरला अटक

वैराग येथील एका बोगस भोंदू डॉक्टरला अटक

वैराग - वैद्यकिय व्यवसाय करण्यासाठी वैद्यकिय 'शिक्षण, पदवी, व ज्ञान नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रूग्णावर उपचार करून त्यांची फसवणूक करुन लुबाडले. मुल होण्यासाठी गोळ्या औषध देवून करमाळा तालुक्यातील एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी वैराग येथील एका बोगस डॉक्टरच्या विरोधात इंडियन मेडीकल अॅक्टनुसार वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बोगस डॉक्टरला वैराग पोलिसांनी अटक केली आहे. 

सागर रामभाऊ भस्मे (वय ४०) रा. शिक्षक कॉलीनी, शिवाजी नगर, वैराग असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नांव आहे. या संदर्भात वैराग पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, करमाळा येथील महिलेला मुल होत नसल्याने सदर बोगस डॉक्टरने उस्मानाबाद येथील सहयाद्री हॉस्पीटल येथे पती व पत्नी यांची तपासणी करून मुल होण्यासाठी सदर महिलेला गोळ्या व इंजेक्शन दिले. परंतु, त्या गोळ्या घेतल्यानंतर सदर महिलेच्या अंगावर सुज आली. त्यामुळे सदर महिलेने त्या डॉक्टरला विचारणा केली. त्यावर त्याने थायरॉईड रोग असल्याचे सांगून उपचारासाठी ५५ हजार रुपये डॉक्टरने घेतले. परंतु त्यावर कोणताही गुण आला नाही. उलट अंगाची सुज वाढत गेली. त्यामुळे त्या महिलेने त्या बोगस डॉक्टरचा पत्ता काढला. तो उस्मानाबाद येथे असल्याचे समजले. 

सदर महिलेने उस्मानाबाद येथील आनंद नगर पोलीसांची व नातेवाईकांची मदत घेवून बोगस डॉक्टर सागर भस्मे यास पकडले. हे प्रकरण वैराग पोलिस ठाण्याच्या हद्यीत घडल्याने उस्मानाबाद पोलिसांनी त्यांना वैराग पोलीसात दाखल केले. त्याप्रमाणे वैराग पोलीसात बार्शी पंचायत समितीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. संतोष जगन्नाथ जोगदंड यांनी तो बोगस डॉक्टर सागर भस्मे याच्या विरोधात फिर्याद दिली. 

त्यानुसार भा.द.वि. कलम ४१९, ४२०, ४६८, प्रमाणे इंडियन मेडिकल अॅक्ट १९५६ (२)चे कलम १५ (२), महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट १९६१ चे कलम ३३ (२) प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. वैराग पोलिसानी बोगस डॉक्टर सागर भस्मे यास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि धनंजय ढोणे हे करीत आहेत. या प्रकरणी आणखी लोकांची मोठी साखळी असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com