जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो पलटी

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 6 जुलै 2018

सांगोला रोडवरून मंगळवेढामध्ये लग्न कार्यास येणाऱ्या बोलेरो गाडी (क्र.एम.एच.१३.ए. झेड.९४२६ ) ही गाडी खोमनाळ नाक्यावर आली असता रोडच्यामधून जाणाऱ्या शेळ्यांना वाचवण्याच्या नादात बोलेरो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली.

मंगळवेढा : शहरालगत असलेल्या खोमनाळ नाक्यावर रस्त्यावरून जाणाऱया शेळ्यांना वाचविण्याच्या नादात बोलेरो गाडी पलटी झाली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगोला रोडवरून मंगळवेढामध्ये लग्न कार्यास येणाऱ्या बोलेरो गाडी (क्र.एम.एच.१३.ए. झेड.९४२६ ) ही गाडी खोमनाळ नाक्यावर आली असता रोडच्यामधून जाणाऱ्या शेळ्यांना वाचवण्याच्या नादात बोलेरो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली.

यातील मंगेश पाटील, नागनाथ पाटील, रेणुका पाटील, रुक्मिणी पाटील, कुसुम पाटील ,सुधाकर पाटील (सर्व रा. लक्ष्मी दहिवडी ता. मंगळवेढा) गाडीत अडकले. त्यांना अजित यादव, अरुण कोळी, आबासाहेब नाईकवाडी, बबलू शेख, कृष्णा पाटील, प्रवीण नाईकवाडी व दत्ता बळवंतराव यांनी तात्काळ मदत करत गाडीमधून बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

Web Title: Bolero overturned in an attempt to save the animals