मोहोळ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीस मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

राजकुमार शहा 
सोमवार, 7 मे 2018

निवडणुक प्रक्रियेतील सोळा गावातील सदस्यांनी यापुर्वी झालेल्या निवडणुकीचा निवडणुक खर्च वेळेत शासनाला सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली आहे.

मोहोळ - विविध कारणामुळे मोहोळ तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीच्या 43 जागांच्या पोटनिवडणुकीच्या निवडणुक प्रक्रियेस प्रारंभ झाला असुन हिंगणी (निपाणी) या ग्रामपंचायतीच्या दोन जागांच्या निवडणुक प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान उर्वरित 41 जागांच्या निवडणुकीसाठी येत्या रविवार ता. 27 ला मतदान होणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किशोर बडवे यांनी दिली.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निवडणुक प्रक्रियेतील सोळा गावातील सदस्यांनी यापुर्वी झालेल्या निवडणुकीचा निवडणुक खर्च वेळेत शासनाला सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली आहे. काही सदस्यांनी जात प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही काही जण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्य म्हणुन निवडून आल्याने राजीनामे दिले आहेत. तर काही जण मयत झाले आहेत. या कारणामुळे वरील 41 जागांची निवडणुक जाहीर झाली आहे. 

असा आहे निवडणुक कार्यक्रम -
उमेदवारी अर्ज दाखल करणे - 7 मे ते 12 मे 
छाननी - 14 मे
उमेदवारी अर्ज माघार घेणे - 16 मे 
मतदान - 27 मे 
मतमोजणी - 28 मे 

गावनिहाय सदस्य संख्या पुढीलप्रमाणे -
नरखेड - 10
डिकसळ - 1 
बोपले - 3    
वाघोली / वाघोलीवाडी - 11 
कोथाळे - 1 
भांबेवाडी - 1 
लांबोटी - 1 
शिंगोली / तरटगाव - 2
शिरापूर - 3 
दादपुर - 1 
नजीक पिंपरी - 3 
तांबोळे - 1 
अनगर - 1 
यावली - 1 
आष्टी - 1 
दरम्यान हिंगणा (नि.) च्या निवडणुक प्रक्रियेत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगीती आल्याचे अनेक इछुकांना माहिती नव्हते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Bombay High Courts adjournment for the Mohol Gram Panchayat byelection