esakal | बारामतीत लक्ष्मण जगताप यांच्या "आत्मप्रेरणा" पुस्तकाचे प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत लक्ष्मण जगताप यांच्या "आत्मप्रेरणा" पुस्तकाचे प्रकाशन

गावकुसातल्या लेखकांमुळेचं साहित्यातला आत्मा कायम - हनुमंत चांदगुडे

बारामतीत लक्ष्मण जगताप यांच्या "आत्मप्रेरणा" पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती -  ग्रामीण भागातल्या लेखकामुळे आज आपल्या समाजामध्ये नवीन लेखक निर्माण होण्याचं सातत्य कायम आहे, अनेकवेळा लेखकांना चांगली संधी मिळत नाही. त्यातून चांगला लेखक समोर येत नाही, अशी खंत व्यक्त करत गावकुसातल्या लेखकांमुळेचं आज साहित्यातला आत्मा कायम आहे असे मत  सुप्रसिध्द कवी हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले. बारामती येथे लक्ष्मण जगताप यांच्या "आत्मप्रेरणा" या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

या कार्यक्रमास पत्रकार संदीप काळे आणि पत्रकार सु. ल. खुटवड यांची प्रमुख उपस्थिती होती. तर लेखक व व्याख्याते कुंडलिक कदम, सुप्रसिध्द कवी हनुमंत चांदगुडे, माधव जोशी आणि हेमचंद्र शिंदे इत्यादी मान्यवर यावेळी होते.

मोठी बातमी - AirTel ने जमा केले दहा हजार कोटी रुपये...

निराश झालेल्या लोकांना प्रेरीत करणा-या पुस्तक असून प्रत्येक क्षेत्रात नैराश्य येणा-या तरूणांपासून वयोवृध्दापर्यंतच्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे. मुळात ग्रामीण भागातल्या तरूणाला एखाद्या शहरात गेल्यानंतर अधिक मेहनत घ्यावी लागते, असाच या "आत्मप्रेरणा" पुस्तकात आशय असल्याचं कवी हनुमंत चांदगुडे यांनी सांगितलं

आईच्या सत्काराने भारावले सारे...

"आत्मप्रेरणा" पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लेखक लक्ष्मण जगताप यांच्या आई कमल जगताप यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार सुरू असताना उपस्थित लेखक, वाचक आणि नातेवाईक भारावून गेले.

"आरोग्य आणि शिक्षण हीच आपली खरी संपत्ती असून त्याची जपणूक करायला हवी. वारंवार मुलं आणि पालकांमधील संबंध दुरावल्याची विविध उदाहरणे उघडकीस येत आहे. त्यामुळे आपण मुलांवरती संस्कार करायला कमी पडतोय की, काय असा प्रश्न मला नेहमी पडतो." असं पत्रकार संदीप काळे यांनी मत व्यक्त केलं तसेच "जगताप सरांसारखे शिक्षक जर वर्गात शिकवत असतील, तर त्या माध्यामातून घडणारे विद्यार्थी सुध्दा आत्मप्रेरणा घेऊन जागणारे असतील", हेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

मोठी बातमी - २५ फेब्रुवारीपासून भाजपचा सरकार विरोधात एल्गार, ४०० ठिकाणी करणार आंदोलन...

प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला अजिनाथ वाघमारे, नवनाथ वाघमारे, भारत पवार, बाबासाहेब ढोबळे, प्रदीप परकाळे,  प्रकाशक गिरीश भांडवलकर इत्यादी श्रोते उपस्थित होते.

"आपण लिहिलेलं कुणीतरी वाचावं अशा लेखकांसाठी सकाळ माध्यम फायदेशीर ठरलं. त्यामुळे कागदावर लहिणा-या लेखकांचे लेख वर्तमानपत्रात छापून आले आणि लेखक लिहित राहिले ही गोष्ट सांगताना अभिमान वाटतो. त्यानंतर हे पुस्तक तरूणासाठी असून अधिक तरूणांनी हे पुस्तक वाचायला हवं - लेखक व व्याख्याते कुंडलिक कदम

काही लोकांमध्ये नेहमी नकारात्मक भावना असते, मी खासकरून लहान मुलं आणि तरूणांच्यावरती विचार आणि चिंतन करू लागलो. या चिंतनातून एकादं पुस्तक तयार व्हायला हवं असं मला नेहमी वाटतं होतं. त्या प्रेरणेतून हे पुस्तक घडलं आहे. प्रत्येक निराश झालेल्या व्यक्तीने हे पुस्तक वाचायला हवे - लेखक व सर, लक्ष्मण जगताप

"निराश झालेल्या प्रत्येक व्यक्तीने ते पुस्तक वाचायला हवे, ज्याला जे पाहिजे ते त्यामध्ये मिळेल. आत्मप्रेरणा हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या आयुष्यातील मळभ नक्की दूर होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं - पत्रकार सु. ल. खुटवड

book launch of laxman jagtaps aatmaprerana done in baramati