कोल्हापूर महापालिकेत उद्या सीमाप्रश्‍नी ठराव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

निपाणी - सीमाभागातील मराठी जनतेला 1956 महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा द्यावा लागत आहे. या लढ्यात सीमाबांधवांना कोल्हापूरसह महाराष्ट्राचा सदैव पाठिंबा आहे. लढ्याला आणखी बळ येण्यासाठी 19 जानेवारीला कोल्हापूर महापालिकेत होणाऱ्या सभेत सीमाप्रश्‍नासह सीमाबांधवांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव करणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांनी मंगळवारी दिली.

हुतात्मादिनी सीमालढ्यातील हुतात्म्यांना निपाणीत आज अभिवादन केल्यावर बोलताना फरास म्हणाल्या की, सध्या प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात असला तरी मराठी भाषिकांची बाजू भक्कम असल्याने सीमाबांधवांना न्याय मिळेल, याचा विश्वास आहे.'

Web Title: border dispute decission in kolhapur municipal