उत्तर सोलापूर तालुक्याचा दुष्काळात समावेशासाठी दोन्ही काँग्रेसचे शनिवारी धरणे 

Both the Congress agitation for the inclusion of North Solapur taluka drought
Both the Congress agitation for the inclusion of North Solapur taluka drought

सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्‍यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी (ता. 3) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी दिली. तालुक्‍याचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात करण्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील शेतीसाठी पाण्याचा कोणताही शाश्‍वत स्त्रोत उपलब्ध नसतानाही तालुक्‍याचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात केला नाही. पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, माढा या तालुक्‍यामध्ये उजनी कालव्याच्या, भीमा व सीना नद्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो. त्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. तरीही या सगळ्याच तालुक्‍यांचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात केला आहे. मात्र, उत्तर सोलापूर तालुक्‍याला त्यातून वगळल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्‍याचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात करण्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हेही उपस्थित राहणार आहेत. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही श्री. साठे यांनी केले आहे. 

सहकारमंत्र्यांवर खापर -
उत्तर सोलापूर तालुक्‍याचा समावेश दुष्काळामध्ये न होण्यास सहकारमंत्री सुभाष देशमुख हे जबाबदार आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीतील राग त्यांनी अशाप्रकारे व्यक्त केला असल्याचे सांगत श्री. साठे यांनी खापर सहकारमंत्री देशमुख यांच्यावर फोडले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com