दोन्ही कॉंग्रेसकडून बहुमताचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी आज कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची हॉटेल सयाजी येथे सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेत आम्ही सर्वांना सोबत घेऊन बहुमतापर्यंत मजल मारल्याचा दावा दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला. या संदर्भात व्यापक बैठक शुक्रवारी (ता.17) घेण्यात येणार आहे. बैठकीस कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेत दोन्ही कॉंग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याचे मी स्वागत करतो. त्यामुळे आम्हाला अधिकृतपणे शिवसेनेशी चर्चा करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची तारीख जवळ येईल, तशा सत्तेसाठी दोन्ही पक्षांच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपकडून सर्व बाजूंनी जोडण्या सुरू आहेत. पाठिंबा मिळविण्यासाठी भेटीगाठी सुरू आहेत. रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच असेल, असा दावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेतली. यावेळी सर्वांना सोबत घेऊन जाण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रकाश आवाडे, भुदरगडमधील शाहू विकास आघाडी, चंदगडमधील युवक आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल, तर आपापल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न करण्याचेही ठरले. यासंदर्भात 17 मार्चला व्यापक बैठक घेण्याचा निर्णय झाला. बैठकीस माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार दिनकरराव जाधव, चंदगडच्या आघाडीचे नेते यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

स्थानिक आघाड्यांबरोबरच शिवसेनेसोबतही आमची चर्चा सुरू आहे. शिवसेनेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी कॉंग्रेसने बहुमतापर्यंत मजल मारली आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

Web Title: Both the Congress vote claim