कोणालाच फुटला नाही घाम ; अखेर दोन दिवस तडफडून युवकाने सोडले प्राण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

हाता तोंडाशी आलेला तरुण मुलगा केवळ उपचारा अभावी गमवावा लागला.

नवेखेड (जि. सांगली) :  मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या फारनेवाडी( बोरगाव, ता वाळवा) येथील सुरज भानुदास फारने या २७ वर्षीय तरुणाचा वेळीच उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. 

जाणाऱ्या प्रत्येक दवाखान्यात तुमच्या जवळ कोरोना तपासणीचा रिपोर्ट आहे का? असेल तरच आत या असा डॉकटरणी लावलेला सूर आणि आमच्या मुलाची लघवी तुंबली आहे. त्याला कोरोना आजार नाही असे सांगणारे हतबल कुटुंबीय असे चित्र दोन दिवस या कुटुंबाने अनुभवले आणि हाता तोंडाशी आलेला तरुण मुलगा केवळ उपचारा अभावी गमवावा लागला.

बोरगाव जवळच्या फारनेवाडी गावचा सूरज याने अभियांत्रिकी मधील पदविका घेऊन काही काळ नोकरी केली. त्यानंतर गावी येऊन तो पदवीधर झाला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचं या उद्देशाने रात्रं-दिवस अभ्यास करू लागला. दोन दिवसांपूर्वी त्याला किडनी स्टोनचा त्रास झाला स्थानिक डॉकटरांना दाखवले. लघवी तुंबली होती. इस्लामपूर येथील एका दवाखान्यात तुंबलेली लघवी रिकामी करण्यात आली. त्या ठिकाणी डायलिसिसची यंत्रणा नसल्याने त्याला कराडला नेहण्याचा सल्ला फारने कुटुंबाला देण्यात आला. कराडला गेल्यानंतर जाईल त्या दवाखान्यात तुमचा कोरोनाचा रिपोर्ट आहे का अशी विचारणा त्यांना होऊ लागली. आमच्या पेशंटचा प्रॉब्लेम दुसरा आहे. त्याला अगोदर बघा आम्ही टेस्टही करतो असे डॉक्टरांना फारने कुटुंब सांगत होते. परंतु डॉक्टर लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पैसे भरण्याची तयारी असतानाही या पेशंटला कोणत्याही दवाखान्यात प्रवेश मिळाला नाही. दोन दिवस लघवी तुंबल्याने शरीराच्या इतर अवयावर परिणाम झाला. ऑक्सिजन पातळी कमी झाली आणि त्या तरुणांचा डोळ्यादेखत मृत्यू झाला. 

हे पण वाचाहृदय हेलावणारी घटना; अंत्यसंस्कारानंतरही मृतदेहाची हेळसांड! स्थिती पाहून संतापाची लाट

 

''गेले दोन दिवस आम्ही दवाखान्यात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु कोणीही दाखल करून घेतले नाही.'' 

हे पण वाचाअसा झाला भ्रष्टाचाराचा भांडा फोड ; शासनाचीच केली तब्बल 16 लाखांची फसवणूक

- शिवाजी फारने,  नातेवाईक

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy died because not available treatment