मधाचे पोळे काढताना विद्यार्थ्याचा मृत्यू

तुकाराम सावंत
सोमवार, 8 एप्रिल 2019

डिचोली : झाडावर चढून मधाचे पोळे काढतेवेळी मधमाशांनी केलेल्या  हल्ल्यातून बचाव करण्यासाठी धडपड करताना पोटाला दोरीचा फास आवळल्याने 19 वर्षीय कॉलेज विद्यार्थ्याला मृत्यू येण्याची घटना डिचोलीत घडली. तर मधमाशांनी केलेल्या  हल्ल्यात अन्य एक युवक गंभीर जखमी झाला.

मूळ बिहार येथील मयत युवकाचे नाव राजन मुखिया असे असून, कुटुंबासह तो मांद्रेकरवाडा-बोर्डे येथे राहत होता. राजन  येथील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. गेल्याच महिन्यात त्याने बारावीची परीक्षा दिली होती. मयत राजन हा उत्कृष्ट लंगडी आणि कबड्डी खेळाडू होता. दोन्ही क्रीडा प्रकारात त्याने राज्य तसेच राष्ट्रीय  पातळीवर प्रतिनिधीत्व केले आहे. दोनच दिवसांपुर्वी त्याच्याच नेतृत्वाखाली शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलांच्या संघाने कबड्डीचे राज्य विजेतेपद पटकावले आहे.

Web Title: a boy died while operating on honey bee s comb