लग्नाची मागणी करत युवतीवर रोखले पिस्तूल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

शाहूपुरीत एक 23 वषींय युवती राहण्यास असून तिची जून 2015 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरबाज नईम शेख याच्याशी मैत्री झाली. मैत्रीनंतर त्या दोघांमध्ये वारंवार फेसबुक चॅटींग होवू लागले. चांगली मैत्री झाल्यानंतर ती युवती आणि आरबाज शेख हे दोघे एकमेकांना भेटू लागले. आरबाज हा त्या युवतीचा दुचाकीवरुन पाठलाग करायचा आणि तीला अडवत असे.

सातारा : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नासाठी शाहूपुरीत राहणाऱ्या 23 वर्षीय युवतीला पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी साताऱ्यातील गुरुवार पेठेत राहणाऱ्या आरबाज नईम शेख याच्याविरोधात सोमवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल असणारा शेख हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

शाहूपुरीत एक 23 वषींय युवती राहण्यास असून तिची जून 2015 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरबाज नईम शेख याच्याशी मैत्री झाली. मैत्रीनंतर त्या दोघांमध्ये वारंवार फेसबुक चॅटींग होवू लागले. चांगली मैत्री झाल्यानंतर ती युवती आणि आरबाज शेख हे दोघे एकमेकांना भेटू लागले. आरबाज हा त्या युवतीचा दुचाकीवरुन पाठलाग करायचा आणि तीला अडवत असे. अडवणारा आरबाज शेख हा त्या युवतीस लग्न करण्याबाबत वारंवार विचारत असे. लग्नास सदर युवती संमती देत नसल्याने आरबाज शेख हा सतत चिडून असायचा. युवती लग्नास तयार होत नसल्याने नंतरच्या काळात आरबाजने वारंवार तीचा पाठलाग करणे सुरु केले. देवी चौक तसेच शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयाजवळ अडवून आरबाज हा पिस्तुल व चाकुचा धाक दाखवत असे. धाक दाखवत असतानाच आरबाज हा युवतीला तसेच तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत असे.

युवती ज्या जीममध्ये जात असे त्याठिकाणी जावून तसेच वाटेत अडवून आरबाज हा युवतीच्या दुचाकीची चावी हिसकावून घेत तीला त्रास देत असे. जुन 2015 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत आरबाजने वारंवार त्या युवतीला शस्त्रांचा धाक दाखवत धमकावत शारिरिक आणि मानसिक त्रास दिला. वारंवारच्या त्रासास कंटाळून त्या युवतीने सोमवारी रात्री याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली. याचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. किर्दत या करीत आहेत. गुन्हा दाखल असणारा शेख फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात
येत आहे.

Web Title: boy forcefully proposed girl on gunpoint in Satara