कोल्हापूरः अपार्टमेंटची संरक्षक भीत कोसळली, मुलगा जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

कोल्हापूर -  शहरातील शिवाजी पार्कमध्ये एका अपार्टमेंटच्या कंपाउंडची भिंत आज सकाळी अकराच्या सुमारास कोसळली. या घटनेत सहा वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. निकुल उर्फ बाबू प्रकाश साळवे असे त्याचे नाव आहे.  

कोल्हापूर -  शहरातील शिवाजी पार्कमध्ये एका अपार्टमेंटच्या कंपाउंडची भिंत आज सकाळी अकराच्या सुमारास कोसळली. या घटनेत सहा वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. निकुल उर्फ बाबू प्रकाश साळवे असे त्याचे नाव आहे.  

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील शिवाजी पार्कमधील एका अपार्टमेंटची संरक्षक भीत कोसळली. यावेळी त्याठिकाणी लघुशंकेसाठी उभा असलेला निकुल हा मुलगा या भीतीखाली सापडला. ही घटना तेथे उभे असणाऱ्या नागरिकांनी पाहिली. निकुलला ताबडतोब बाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy injured in a wall damage incidence in Shivaji Park Kolhapur