ब्रेन डेड कृष्णहरीं बोम्मा यांचे अवयवदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

सोलापूर - रिक्षाने धडक दिल्याने ब्रेन डेड झालेले भाजपचे बूथ प्रमुख कृष्णाहरी सतय्या बोम्मा (वय 46) यांची अवयवदान प्रक्रिया आज (गुरुवारी) झाली. ग्रीन कॅरिडोअरसाठी शासकीय रुग्णालयासह पोलिस प्रशासनानेही तत्परता दाखविली. 

सोलापूर - रिक्षाने धडक दिल्याने ब्रेन डेड झालेले भाजपचे बूथ प्रमुख कृष्णाहरी सतय्या बोम्मा (वय 46) यांची अवयवदान प्रक्रिया आज (गुरुवारी) झाली. ग्रीन कॅरिडोअरसाठी शासकीय रुग्णालयासह पोलिस प्रशासनानेही तत्परता दाखविली. 

बोम्मा यांना रिक्षाने धडक दिल्याने डोक्‍याला गंभीर जखम झाली होती. बोम्मा बेशुद्धावस्थेत होते. आज सकाळी शासकीय रुग्णालयात त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे हृदयाचे कार्य नियमित सुरू राहण्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. काही तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. त्यांना व्हेंटिलेटलवर ठेवण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्यात सुधारणा होईल, असा विश्‍वास बोम्मा परिवार आणि डॉक्‍टरांना वाटत होता. मात्र, आज सकाळपर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसून आली नाही. त्यानंतर त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. 

भावाच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय तिन्ही भाऊ आणि भावजी सत्यम गुर्रम, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, सदानंद गुंडेटी व मित्र परिवाराने घेतला. कृष्णाहरी बोम्मा यांचे डोळे, त्वचा, यकृत, किडनी हे अवयव दान करण्यात आले. ग्रीन कॅरिडोअरसाठी शासकीय रुग्णालयासोबतच पोलिस प्रशासनानेही तयारी केली होती. 

कृष्णहरी बोम्मा यांच्यामुळे दोन जणांना डोळे, दोन जणांना किडनी, एकास लिव्हर मिळाले आहे. कृष्णहरींचे हृदय देण्याची तयारी केली होती, पण तांत्रिक अडचणी आल्या. सोलापुरात अवयवदानासाठी लोक पुढे येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. गेल्या वर्षभरात राबविलेल्या मोहिमांमुळे दुख:त असतानाही नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येत आहेत. 
- डॉ. सुनील घाटे, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय

Web Title: Brain Dead Krishnirim Bomma did organ donation