सांगली जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता खाडे बडतर्फ 

zp sangli
zp sangli

सांगली ः जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता राहुल खाडे यांना कामातील अनियमितता आणि बेकायदेशीरपणे गैरहजर राहिल्याच्या कारणावरुन बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी ही कारवाई केली. 


छोटे पाटबंधारे विभागात शाखा अभियंता म्हणून खाडे कार्यरत होते. जलसंधारणाच्या कामाबाबत त्यांच्याविषयी बहुतांशी तक्रारी होत्या. त्यावरुन त्यांच्या कामाची चौकशी करण्यात आली होती. चौकशीमध्ये कामामध्ये अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरही कामात कोणतीही सुधारणा झाली नाही. याशिवाय कामे प्रलंबित ठेवली जात होती. याशिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे शाखा अभियंता खाडे यांच्यावर 2009 मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 


निलंबनाच्या कालावधीत शिराळा पंचायत समिती मुख्यालय म्हणून कामासाठी नियुक्ती केली होती. त्यानंतर मार्च 2018 पर्यंत म्हणजे तब्बल दहा वर्षे गायब झाले होते. त्यांना कामावर रुजू होण्याबाबत लेखी पत्रव्यवहार करण्यात आला होता, परंतू प्रशासनाच्या आदेशाला त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. अभियंता खाडे दहा वर्षे बेकायदेशीर गैरहजर राहिल्यानंतर एक एप्रिल 2018 पासून कामावर रुजू झाले. प्रशासकीय कामात केलेला हलगर्जीपणा, आदेश डावलणे, बेकायदेशीरपणे गैरहजर राहणे, हे सर्व प्रकार गंभीर असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचे श्री. गुडेवार यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com