एअर कंडिशनिंग क्षेत्रात केले ब्रॅंडिंग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

कोल्हापूर - शिक्षण बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी). इलेक्‍ट्रॉनिक्‍स फिल्डचा जराही गंध नाही; मात्र करिअर घडविले ते एअर कंडिशनिंग मेंटेनन्स व्यवस्थापनात. एअर कंडिशनिंग क्षेत्र हे तसे "टफ'. काहीशी पुरुषांचीच मक्तेदारी असलेले हे क्षेत्र खरे तर आव्हानात्मक; पण हे आव्हान जिद्दीने पेलून दाखविले ते सौ. दीपाली पाटील यांनी. स्वत:च्या लिंकवेल एंटरप्रायजेसच्या माध्यमातून कोल्हापूर परिसरात त्यांनी आपले "ब्रॅंडिंग' विकसित केलेय. आज त्यांची एसी व्यवसायात स्वत:ची अशी "आयडेंटी' आहे. 

कोल्हापूर - शिक्षण बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी). इलेक्‍ट्रॉनिक्‍स फिल्डचा जराही गंध नाही; मात्र करिअर घडविले ते एअर कंडिशनिंग मेंटेनन्स व्यवस्थापनात. एअर कंडिशनिंग क्षेत्र हे तसे "टफ'. काहीशी पुरुषांचीच मक्तेदारी असलेले हे क्षेत्र खरे तर आव्हानात्मक; पण हे आव्हान जिद्दीने पेलून दाखविले ते सौ. दीपाली पाटील यांनी. स्वत:च्या लिंकवेल एंटरप्रायजेसच्या माध्यमातून कोल्हापूर परिसरात त्यांनी आपले "ब्रॅंडिंग' विकसित केलेय. आज त्यांची एसी व्यवसायात स्वत:ची अशी "आयडेंटी' आहे. 

उन्हाळा सुरू झाला की, एसीचा खप वाढतो. अलीकडे तर एसी सर्व स्तरांतील लोक विकत घेत आहेत. एसी विकणे तसे खूप सोपे; पण विक्रीपश्‍चात सेवा देणे कठीण. ते अनेक कंपन्या, शोरूमच्या मालकांना जमत नाही. यामुळे एसी विकला की आपले काम संपले, अशी काहीशी स्थिती असते. पण एसी घेतलेल्या ग्राहकाला कायम आपल्याकडे टिकवून ठेवणे, हे महत्त्वाचे. आता तर एसीची कामे वर्षभर सुरू असतात. ग्राहकांशी "कनेक्‍टिव्हिटी' सातत्याने असावी लागते; तरच एसी व्यवसायाचा परीघ विस्तारतो. एखादा व्यवसाय सांभाळणे हे जसे कौशल्य; तसे त्या व्यवसायात कायम वृद्धी कशी होईल, हे पाहणेही गरजेचे असते. 

सौ. दीपाली ही कसरत सांसारिक जबाबदारी पेलत व्यवस्थित पार पाडत आहेत. त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी दहा वाजता. संध्याकाळी साडेसहा वाजता काम संपले तरी रात्री दहा वाजता टेलिकॉलिंग करणे, फोनवर ग्राहकांच्या अडचणी समजून घेणे, दुसऱ्या दिवशी आपल्याकडील एसी टेक्‍निशियन पाठवून एसी दुरुस्त करून देणे, अशी कामे सुरूच असतात. 

अनेकदा एसी घेतला तरी तो कसा चालवायचा याचे ज्ञान अनेकांना नसते. यामुळे रिमोट सेटिंग चुकते. एसी सुरू होत नाही. योग्य तापमानाचा "बॅलन्स' साधला जात नाही. एसीतील पार्ट बदलणे, इन्स्टॉलेशन करणे, कॉम्प्रेसर बसविणे, संबंधित कंपनीच्या "नॉर्म्स'ची पूर्तता करणे आदी कामे पाहावी लागतात. 

याबाबत सौ. दीपाली म्हणतात, ""माझे माहेर सांगली. लग्नानंतर कोल्हापुरात आले. माझ्या पतींनी लिंकवेल एन्टरप्रायजेसची उभारणी केली. या क्षेत्रात चांगले कामगार मिळत नाहीत. एसी घेतलेल्या ग्राहकाला उत्कृष्ट सर्व्हिस द्यावी लागते. यामुळे घरची व्यक्ती म्हणून मीच या क्षेत्रात आले. गेली दहा वर्षे मी कार्यरत आहे. डोके शांत ठेवून काम करावे लागते. जोडलेला ग्राहक टिकवून ठेवावा लागतो. सुरवातीला अनेक ठिकाणी स्वत: व्हिजिट करणे, आर्किटेक्‍टद्वारे नवीन ठिकाणी एसी देणे अशी कामे पाहिली. व्यवसायातील तांत्रिक बाबी पतीकडून शिकून घेतल्या. मी स्वत: मेंटेनन्स डिपार्टमेंट सांभाळते. माझ्या हाताखाली पाच टेक्‍निशियन्स आहेत. शिरोली, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, हॉस्पिटल, कॉर्पोरेट डीलर्स, साखर कारखाने, अपार्टमेंटस्‌, गुजरी, हॉटेल उद्योग असे सर्वत्र एसी विकले आहेत. आमच्याकडे मित्सुबिशी, गोदरेजची डीलरशिप आहे.'' 

त्या म्हणाल्या, ""महिलांकडे असणारा "मॅनेजमेंट फॅक्‍टर' मला इथे उपयुक्त ठरला. कोणत्याही कामासाठी आत्मविश्‍वास, इच्छाशक्ती लागते, म्हणजे यशस्वी होता येते. हा व्याप सांभाळत मी रविवारी पूर्णवेळ कुटुंबासाठी देते. मुलगी आरोहीबरोबर बॅडमिंटनही खेळते. घरच्यांची साथ असल्यामुळेच मी इथे आज उभी आहे.'' 

Web Title: Branding in air conditioning sector