धाडसी चोरी : शटर उचकटुन काय नेले पहा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

करकंब (ता. पंढरपूर) येथील राजेश शांतिकुमार शहा यांच्या कसबा पेठेतील शांतीपुष्प कॉम्प्लेक्‍स या राहत्या घरातील गोदामाचे पहाटे पहाटे पाचच्या दरम्यान दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

करकंब (सोलापूर) : करकंब (ता. पंढरपूर) येथील राजेश शांतिकुमार शहा यांच्या कसबा पेठेतील शांतीपुष्प कॉम्प्लेक्‍स या राहत्या घरातील गोदामाचे पहाटे पहाटे पाचच्या दरम्यान दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेश शांतिकुमार शहा यांच्या दुकानाच्या गोदामाचे शटर उचकटून आतील बाजूच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानाच्या ड्रावरमधील व घरातील कपाटातील दोन लाख 10 हजार रुपये किमतीच्या प्रति 10 ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या अंगठ्या, एक लाख 22 हजार 500 रुपये किमतीच्या प्रति पाच ग्रॅम वजनाच्या सात सोन्याच्या रिंग, एक लाख 40 हजार रुपये किमतीच्या 40 ग्रॅम वजनाची सोन्याच्या जपमाळ, 49 हजार रुपये किमतीची 

हेही वाचा - शिक्षक सघांची महामंडळ कोल्हापूरात १९ जानेवारीला सभा
असा आहे मुद्देमाल...

प्रति सात ग्रॅम वजनाची दोन जोड सोन्याची कर्णफुले, 35 हजार रुपये किमतीची प्रति पाच ग्रॅम वजनाची दोन सोन्याची कर्णफुले, 87 हजार 500 रुपये किमतीचा 25 ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा नेकलेस, 35 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे पान, एक लाख पाच हजार रुपये किमतीचे प्रति पाच ग्रॅम वजनाची सहा सोन्याची पाने, 10 हजार रुपये किमतीचे दोन सोने विरहित मोत्याचे हार, 70 हजार रुपये किमतीची अडीच किलो चांदीची नाणी व जुने दागिने, 65 हजार रुपये रोख रक्कम व तीन हजार रुपये व पोलो कंपनीचे पॉकेट असा एकूण रोख रकमेसह नऊ लाख 32 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून पलायन केले आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश मुंढे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The brave theft of nine lakh 32 thousand