गरीबाच्या ताटातील भाकरही महागली

गरीबाच्या ताटातील भाकरही महागली

ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून राज्यभर प्रसिद्ध असताना या भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पावसाअभावी खरीप व रब्बीची  पेरणीच झाली नसल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांसह गोरगरीब मजुरांची भाकरीही महागल्याने आता जगायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

यावर्षी झालेल्या अत्यल्प प्रर्जन्यमानामुळे काही  क्षेत्रांतील भागात पेरणी झाली परंतु, वातावरणामुळे पिके करपू लागली आहे. जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून या शिवारातील ज्वारीच्या कडब्याला मागणी जास्त असलीतरी पेरणी नसल्यामुळे भागातील ज्वारीचा कडबा नाहीसा झाला असून यावर्षी उत्पादन नसल्यामुळे कडब्याला सोन्याचे दिवस आले आहेत. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भर पावसाळ्यातच पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला. बाजरी, मूग, उडिद, मटकी उत्पादन घटले गेले. तालुक्यातील मंगळवेढा, ब्रह्मपुरी, बाराळे, मुंढेवाडी, मरवडे या शिवारातील पांढरी शुभ्र चवदार (जी.आय नामांकन) असलेल्या ज्वारीची पेरणीच झाली. नसल्यामुळे हजारो हेक्टर वरती उत्पादन घटले असून, दुभत्या जनावरास पोषक असणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. जनावरे कवडी मोल किमतीत बाजारात विकली जात आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारी काढणीचे सुगीचे दिवसच नसल्यामुळे रोजगारही परिणाम झाला. बरेच कुटुंबे ऊस तोड मजुरीस अन्य जिल्ह्यात पोट भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जगावे कसे हा प्रश्न शेतकरी वर्गांना भेडसावत असून, निसर्गाच्या अवकृपामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच दुष्काळाची छाया पसरीत असल्याने याचा विविध भागांवर परिणाम होत आहे. तसेच दक्षिण भागातील परिसरामध्ये पावसाअभावी भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यावर्षी पाऊस पडला नसल्याने रब्बीतील ज्वारी, सूर्यफूल, हरभरा, करडा आदी धान्याची पेरणीच न झाल्याने उत्पादन शून्यावर येणार आहे. पावसाच्या अभावी शिवारातील हरभरा पिकाची पेरणी झाली नसल्यामुळे सकस अशी हिरवीगार भाजी दिसेनाशी वाटू लागली आहे. यामुळे ऐन थंडीच्या दिवसात उन्हाळ्यापूर्वीच अन्नधान्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. 

गेल्यावर्षीपेक्षा ज्वारी, बाजरीच्या किमतीत दुपटीने, तर गहू दीडपटीने महागला आहे. अगोदरच शेतकरी, मजूर पाणीटंचाई, जनावरांचा चारा, आर्थिक समस्यांचा सामना करीत असताना आता त्यांच्या ताटातली भाकरही महागली आहे. यामुळे आता जगायचं कसं, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com