गारगोटी ग्रामपंचायतीत तोडफोड

गारगोटी ग्रामपंचायतीत तोडफोड

गारगोटी - येथील ग्रामपंचायत कार्यालयावर आमदार प्रकाश आबिटकर गटाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी हल्ला करून एका सदस्यासह ग्रामविकास अधिकाऱ्यास धक्काबुक्की केली. कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीत बैठक घेऊन घटनेचा निषेध केला. याप्रकरणी सोमवारी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले. ग्रामविकास अधिकारी जालेंद्र बुवा यांच्या तक्रारीनुसार आमदार आबिटकर गटाच्या ११ आजी-माजी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. आमदार आबिटकर गटाकडून सत्ताधारी गटाविरोधात रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी सांगितले, दुपारी ग्रामविकास अधिकारी बुवा केबिनमध्ये काम करीत होते. या वेळी त्यांच्याकडे माजी उपसरपंच, दोन माजी सदस्य व एका विद्यमान सदस्यांसह अकरा जणांनी विद्यमान सदस्य प्रकाश वास्कर यांच्या नावाच्या सामान्य पावतीची मागणी केली. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दप्तर तपासून पावती देतो, असे सांगितले. यानंतर ११ जणांनी चिडून त्यांना विनाकारण शिवीगाळ करीत केबिनच्या काचा फोडल्या. यात वीस हजारांचे नुकसान केले. 

याप्रकरणी माजी उपसरपंच अरुण शिंदे, माजी सदस्य महेश सुतार, चिदंबर कलकुटकी, विद्यमान सदस्य विश्‍वजित सूर्यवंशी, अमोल कलकुटकी, साजुद्दीन गोलंदाज, प्रथमेश सावंत, बाळासो चौत्रे, राजेंद्र चिले, शंभुराजे चिले, सचिन कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद केला. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कदम, पोलिस निरीक्षक उदय डुबल यांनी तोडफोडीची पाहणी करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

नैराश्‍यातून ग्रामपंचायतीवर हल्ला : भोपळे
गारगोटी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर आमदार प्रकाश आबिटकर गटाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. पराभवाच्या नैराश्‍यातून कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच सचिन देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. घटनेचा निषेध म्हणून सोमवारी सत्ताधारी गटाचे सर्व पदाधिकारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com