कारवाईच्या रागातून वाहतुक शाखेच्या क्रेनची काच फोडली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

इचलकरंजी : येथील शहर वाहतुक शाखेचे पोलीस नो पार्किंगच्या ठिकाणी उभी केलेली मोटरसायकल क्रेनच्या सहाय्याने उचलुन घेवून जात होते. त्याला संबंधीत मोटरसायकलधारकाने कडाडून विरोध करीत शहर वाहतुक पोलिसाच्याबरोबर हुज्जत घालीत,  क्रेनची काच फोडली. हा प्रकार आज दुपारी घडला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावरील पार्किंगला शिस्त यावी. याकरीता शहर वाहतुक पोलिसानी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सम व विषम तारखाना वाहन पार्किंगची सोय करुन, त्यापध्दतीने रस्त्यावर माहिती फलक लावले आहे. तरीदेखील एका मोटरसायकलस्वाराने आपली मोटरसायकल अवैधपणे पार्किंग केली. ही बाब वाहतुक पोलिसाच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधीत मोटरसायकल क्रेनच्या सहाय्याने उचलुन घेवून जावू लागले. यावेळी संबंधीत मोटरसायकलधारकांने त्याला कडाडून विरोध केला. तरीदेखील त्याला न जुमानता पोलिसानी कारवाई सुरुच ठेवली. त्यामुळे संतप्त झालेल्या संबंधीत मोटरसायकलधारक आणि त्यांच्या एका मित्रांनी शहर वाहतुक पोलिस आणि क्रेन चालकाबरोबर हुज्जत घालीत क्रेनवर लाथा घालीत क्रेनची दर्शनी बाजूची काच फोडली. याप्रकाराने मुख्य रस्त्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Web Title: break the glass of traffic police crane in anger of action