वाहनवाढीला यंदा "ब्रेक' 

वाहनवाढीला यंदा "ब्रेक' 

सातारा - गेल्या तीन वर्षांतील आर्थिक मंदीचा फटका वाहन व्यवसायालाही बसला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदा वाहन विक्रीचा वेग मंदावला आहे, तरीही गेल्या वर्षभरामध्ये दररोज 90 दुचाकी व 12 चारचाकी वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने रस्ते व पार्किंग व्यवस्थेची नव्याने आखणी करणे आवश्‍यक आहे. 

दुचाकी आणि चारचाकी वाहने प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. 2002 मध्ये जिल्ह्यामधील एकूण वाहनांची संख्या दोन लाख चार हजार 354 होती. 2017 - 2018 या आर्थिक वर्षात केवळ सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 50 हजार 443 वाहनांची भर पडली होती. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात एकूण वाहनांच्या संख्येत पाच हजार 416 ची वाढ झाली होती. अशीच वाढ गेल्या अनेक वर्षांपासून वाहनांच्या संख्येत होत आली आहे. 

गेल्या चार वर्षांपासून देशात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. त्यानंतर झालेली नोटाबंदी व जीएसटीमुळेही या मंदीला बळ मिळाल्याचे बोलले जाते. त्याला वाहन संख्येच्या आकडेवारीने बळ मिळत आहे. अनेक वर्षांपासून होत असलेल्या वाहन वाढीला यंदा "ब्रेक' बसला आहे. अनेक वर्षांतून पहिल्यांदा मागील वर्षाच्या तुलनेत कमी वाहनांची विक्री झाली आहे. दिवाळीपर्यंतचा काळ हा मुख्यत: वाहन खरेदीचा काळ असतो. त्यामुळे दहा नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी वाहनांची विक्री झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

वाहनांच्या खरेदीचा मागील वर्षातील तुलनेत वेग कमी आला असला, तरीही खपाच्या आकडेवारीनुसार दररोज सुमारे 90 दुचाकी, तर 12 चारचाकी वाहनांची सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, तुलनेत रस्त्यांचा दर्जा, त्यांची रुंदी, पार्किंगची व्यवस्था याकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. वाहनांची वाढती संख्या थांबविणे शक्‍य नाही; पण प्रदूषण, अपघात नियंत्रण व पार्किंगचा प्रश्‍न सोडविणे प्रशासन व शासनकर्त्यांच्या हातात आहे. वाहनांच्या संख्येच्या वाढत्या वेगाचा विचार करून याबाबत नियोजन करणे आवश्‍यक आहे. 

वाहन खपाची स्थिती 
(दहा नोव्हेंबर 2018 पर्यंत) 

वर्ष दुचाकी चार चाकी 
2016 30589 4581 
2017 31502 4686 
2018 28515 3879 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com