ब्रेकिंग : मिरजमध्ये सामुहिक नमाज  पठण करताना 41 ताब्यात 

miraj namaj.jpeg
miraj namaj.jpeg

मिरज-"कोरोना' साथीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू असताना मशिदीमध्ये एकत्र येऊन नमाज पठण करणाऱ्या 41 जणांना पोलीसांनी आज ताब्यात घेतले. या मशिदीच्या बिहारी मौलानासह विश्वस्तांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या नमाज पठणासाठी पुढाकार घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक साजिदअली पठाण आणि अन्य सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना मशिदीपासून शहर पोलिस ठाण्यापर्यंत पोलिसांनी चालवत आणले. 

शहरात सर्वत्र संचारबंदी आणि जमावबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी सर्व धार्मिक स्थळांना मधील सामुदायिक प्रार्थना आणि अन्य विधींना सक्त मनाई करण्यात आली आहे. तरीही येथील मटण मार्केट नजीकच्या बरकत मशिदीमध्ये आज दुपारी सामुदायिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले. याप्रकरणी माजी नगरसेवक साजिदअली पठाण यांनी पुढाकार घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघडकीस स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने बरकत मशिदीजवळ जाऊन नमाज पठणामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी काहीजणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्वांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

यापैकी 26 जणांना पोलिसांनी त्यांच्या वाहनातून पोलीस ठाण्यापर्यंत आणले. परंतु या मशिदीचे विश्वस्त आणि याच मशिदीचे मूळचे बिहारमधील असलेले मौलाना या दोघांसह अन्य पंधरा जणांना रस्त्यावरून चालवत पोलीस ठाण्यापर्यंत आणण्यात आले. सामुदायिक नमाज पठणाचे आयोजन करून संचारबंदी जमावबंदी आदेशासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 
दरम्यान संचारबंदी मोडून नमाज पठण करत असल्याच्या घटनेबद्दल सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com