ब्रेकिंग : भाजप प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर कोरोना "पॉझिटीव्ह' 

घनश्‍याम नवाथे
Tuesday, 8 September 2020

सांगली- जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून राजकीय नेते मंडळी देखील बाधित होत आहेत. जिल्ह्यातील खासदार आणि सात आमदार कोरोना बाधित झाले असून भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांचा अहवाल देखील "पॉझिटीव्ह' आला आहे. 

सांगली- जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून राजकीय नेते मंडळी देखील बाधित होत आहेत. जिल्ह्यातील खासदार आणि सात आमदार कोरोना बाधित झाले असून भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांचा अहवाल देखील "पॉझिटीव्ह' आला आहे. 

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून सद्यस्थितीत 18 हजाराच्या आसपास रूग्णसंख्या पोहोचली आहे. गेल्या काही दिवसापासून रोज सातशेच्या पटीत रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोनामुळे राजकीय नेते मंडळी देखील बाधित होत आहेत. जिल्ह्यातील खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, आमदार सदाभाऊ खोत, आमदार विक्रम सावंत, आमदार सुमन पाटील हे नुकतेच कोरोना बाधित झाले आहेत.

सर्वांची प्रकृती ठीक असून त्यापैकी आमदार गाडगीळ, आमदार खाडे, आमदार कदम, आमदार खोत हे कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील हे देखील कोरोना बाधित झाले आहेत. त्यापैकी माजी आमदार पवार, माजी आमदार शिंदे, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील हे कोरोनामुक्त झाले आहेत. 

सध्या राजकीय नेते मंडळी कोरोनामुळे बाधित होत असल्याचे दिसत असून त्यांनी संपर्कातील कार्यकर्त्यांना चाचणी करण्याचे व दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील खासदार आणि सात आमदार आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झाले असून भाजपचे प्रवक्ते आमदार पडळकर हे देखील आता कोरोना बाधित झाले आहेत. त्यांची नुकतेच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्रलंबित होता. दरम्यान ते मुंबईत अधिवेशनासाठी गेले आहेत. तेथे पोहोचल्यानंतर त्यांचा अहवाल आज "पॉझिटीव्ह' आला आहे. त्यांना कोणताही त्रास नसून प्रकृती ठीक असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking : BJP spokesperson MLA Gopichand Padalkar Corona "positive"